सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसन याने (James Anderson) गुरूवारी (२५ ऑगस्ट) मँचेस्टर येथील दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरतात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणारा गोलंदाज असलेल्या अँडरसनने, आपल्या घरच्या मैदानावर १०० कसोटी सामने पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
James Anderson became the first to a rare feat in Manchester in the #WTC23 clash against South Africa ????#ENGvSAhttps://t.co/6jjykYuf6f
— ICC (@ICC) August 25, 2022
सध्या जगातील सर्वात अनुभवी कसोटीपटू असलेल्या ॲंडरसनने आतापर्यंत १७४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ६५८ बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याच्यापेक्षा अधिक कसोटी बळी केवळ श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) व ऑस्ट्रेलियाचा दिवंगत शेन वॉर्न (७०८ बळी) यांनी मिळवले आहेत. अँडरसननंतर आपल्या घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा क्रमांक लागतो. सचिनने भारतात ९४ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (९२ कसोटी) व इंग्लंडचाच स्टुअर्ट ब्रॉड (९१ कसोटी) या यादीमध्ये अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
उभय संघातील कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत केले होते. अवघ्या अडीच दिवसात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला एक डाव आणि १२ धावांनी मात दिलेली. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दक्षिण आफ्रिका प्रयत्न करेल. तर, दुसरीकडे इंग्लंड मालिकेतील आपले आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची लॉटरी, जायबंदी वेगवान गोलंदाजाच्या जागी आशिया चषकासाठी निवड?
Asia Cup 2022 | ‘या’ पाच कर्णधारांनी जिंकले आहेत सर्वाधिक सामने, यादीत एका भारतीयाचाही समावेश






