इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी गुरुवारपासून लॉर्ड्सवर सुरू होत आहे. स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनने सामना सुरू होताच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. पाचव्या षटकात ३ धावांवर खेळत असलेल्या सलामीवीर सरेल इरवीला अँडरसनने यष्टिरक्षक बेन फॉक्सच्या हाती झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अँडरसनच्या शानदार इनस्विंगने बॅटची कड घेतली आणि विकेटच्या मागे गेला आणि इथे फॉक्सने कोणतीही चूक केली नाही. अशाप्रकारे अँडरसनने घरच्या मैदानावर ४२१ विकेट घेतल्या. यासह अँडरसनने या सामन्याद्वारे इतिहास रचला आहे.
19 years after his Test debut at Lord's, James Anderson has another milestone at home 🏴 pic.twitter.com/kMh7aFSh10
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 25, 2022
एकाच देशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा अँडरसन हा पहिला खेळाडू ठरला आहे. इंग्लंडमध्ये १००वी कसोटी खेळणारा जेम्स अँडरसन हा एकमेव खेळाडू ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम गाठला. तो लॉर्ड्सवर त्याच्या १००व्या कसोटीत गोलंदाजी करत आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला खेळाडूंवर विनाकारण ओरडायला सांगतात’, बांग्लादेशच्या प्रशिक्षकाने केला आरोप
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा सर्वात अवघड ‘पेपर फुटला’, महत्वाच्या फलंदाजाची कमजोरी झाली उघड