सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस (ashes series) मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (england vs australia) हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पहिला डाव ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला होता. तर प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला अवघ्या २३६ धावा करता आल्या. दरम्यान नाबाद राहिलेल्या जेम्स अँडरसनच्या (James Anderson) नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंड संघाचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १६७ वा सामना आहे. याच सामन्यात त्याने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिला असा फलंदाज ठरला आहे, जो १०० वेळेस नाबाद राहिला आहे(most not outs in test cricket). यापूर्वी असा कारनामा कुठल्याही फलंदाजाला करता आला नाहीये.
जेम्स अँडरसन नेहमी ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येत असतो. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १३ चेंडूंचा सामना केला. ज्यामध्ये तो ५ धावा करत नाबाद राहिला. सर्वाधिक वेळेस नाबाद राहणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी कर्टनी वॉल्श आहे. जे आपल्या कारकीर्दीत ६१ वेळेस नाबाद राहिले होते. तर श्रीलंकेचे दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन ५६ वेळेस नाबाद राहिले होते. तर बॉब विल्स यांनी ५५ वेळेस नाबाद राहण्याचा पराक्रम केला होता.(100 not outs in test cricket)
या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४७३ धावांचा डोंगर उभारला होता. ज्यामध्ये मार्नस लाबुशेनने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली होती. तर डेविड वॉर्नरने ९५ आणि स्टीव्ह स्मिथने ९३ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून डेविड मालानने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. तर जो रूटने ६२ धावांचे योगदान दिले होते. इंग्लंड संघाचा पहिला डाव २३६ धावांवर कोसळला होता.
महत्वाच्या बातम्या :
गांगुली म्हणतोय, “… विराट आजकल खूप भांडतोय”
भारतीय क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाण्या दिवसाची वर्षपूर्ती! अवघ्या ३६ धावांवर विराटसेना झालेली ढेर
मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली सारी कारकीर्द घालवलेला नयन मोंगिया