---Advertisement---

एवढा भारी रेकाॅर्ड आता जेम्स अँडरसनच्या नावावर झालाय, आधी सचिनचं होतं ‘या’ विक्रमावर राज्य

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 6:24 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. तसेच या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने एकही चेंडू न टाकता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने गेली अनेक वर्ष इंग्लंड संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील तो भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकत आहे. ओव्हलवर सुरु असणारा सामना जेम्स अँडरसनचा कारकिर्दीतील १६६ वा कसोटी सामना असून मायदेशातील ९५ वा सामना आहे.

त्यामुळे अँडरसनने मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.

सचिनने भारतीय संघासाठी भारतात एकूण ९४ कसोटी सामने खेळले आहेत. तर या यादीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये ९२ कसोटी सामने खेळले आहेत.(James Anderson set a big record of most test matches played in a country)

मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू
९५* सामने – जेम्स अँडरसन
९४ सामने – सचिन तेंडुलकर
९२ सामने – रिकी पाँटिंग
८९ सामने – ॲलिस्टर कूक
८९ सामने स्टीव्ह वॉ
८८ सामने – जॅक कॅलिस

चौथ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन : रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

महत्त्वाच्या बातम्या – 

ओव्हल कसोटीत भारतीय संघ उतरला दंडाला काळी पट्टी बांधून; ‘हे’ आहे कारण

विराट जिथे, विक्रम तिथे! कोहलीचा ओव्हल कसोटीदरम्यान मोठा विश्वविक्रम; सचिन, पाँटिगही पडले मागे

“पत्रकार परिषद संपवून आला अन् निवृत्तीची घोषणा केली”, शास्त्रींनी सांगितला धोनीच्या कसोटी निवृत्तीचा किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---