---Advertisement---

“त्याला बाद केले तरी मला फरक पडणार नाही”, जेम्स अँडरसनचे भारतीय कर्णधाराबाबत वक्तव्य

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 5:04 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंघम येथे सुरू झाला आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी, खेळाडूंची एकमेकाविरुध्‍दची वैयक्तिक कामगिरी अनेकदा महत्त्वपूर्ण ठरते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील हे द्वंद्व देखील संपूर्ण क्रिकेट जगाला माहित आहे. पहिल्या सामन्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अँडरसनने याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.

विराट आणि अँडरसनमध्ये होते लढत
विराट कोहली आणि जेम्स अँडरसन अनेक वर्षांपासून एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. २०१४ मध्ये जेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला, तेव्हा अँडरसनने तब्बल चार वेळा विराटला बात करत आघाडी घेतली होती.  त्यानंतर, मजबूत पुनरागमन करताना विराटने २०१८ मध्ये अँडरसनच्या नाकी नऊ आणले. बुधवारपासून सुरू झालेल्या या मालिकेत या दोघांमधील लढत पाहण्यासारखी आहे.

काय म्हणाला अँडरसन?
एका अभासी पत्रकार परिषदेत बोलताना अँडरसन विराटबाबत बोलताना म्हणाला, “मी त्याच्याविरुद्ध पुन्हा खेळण्यासाठी नक्कीच उत्साहित आहे. मला नेहमीच स्वतःला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांनीविरूद्ध खेळायला आवडते आणि तो सर्वोत्तम आहे. फलंदाज आणि कर्णधार म्हणून तो त्यांच्यासाठी किती मोठा खेळाडू आहे हे आम्हाला माहित आहे, त्याचा त्या संघावर मोठा प्रभाव पडतो. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मी त्याला बाद केले तरी मला फरक पडणार नाही. त्याला बाद करणे महत्त्वाचे आहे मग ते मी करू अथवा अन्य कोणी.”

अँडरसन कदाचित अखेरच्या वेळी भारतीय संघात विरुद्ध इंग्लंडमध्ये मालिका खेळत आहे.

इंग्लंडने जिंकली नाणेफेक
इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने पहिल्या सामन्याची नाणेफेक जिंकली असून, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने सर्वांना आश्चर्यचकित करत अनुभवी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन व वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना बाहेर बसले.

पहिला सामन्यासाठी उभय संघ-
भारत-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

इंग्लंड-
रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिब्ली, जॅक क्रॉली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, डॅनियल लॉरेन्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

महत्त्वाच्या बातम्या – 

रूटने नाणेफेक जिंकली अन् विराटचा नावे झाला नकोसा विक्रम, धोनीलाही टाकलंय मागे

“मला खात्री आहे, विराट भैय्या भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकून देईल”

वाईट झालं राव! सुवर्ण पदकाचं स्वप्न तर भंगलं; आता कांस्य पदकासाठी दीपक पुनिया करणार दोन हात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---