इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम करुन अनेकांना चकीत केले आहे. आता त्याच्या नावावर आखणी एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये सध्या कौउंटी चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत लँकाशायर विरुद्ध केंट यांच्यात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सामना सुरु आहे. या सामन्यात लँकाशायरकडून खेळताना जेम्स अँडरसनने पहिल्या डावात १० षटकांत १९ धावा देत ७ विकेट्स घेतल्या. याबरोबर त्याने १००० प्रथम श्रेणी विकेट्स पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९९५ विकेट्स होत्या. त्यामुळे त्याने केंटचा मधल्या फळीतील फलंदाज हायनो कुन्ह याला बाद करत सामन्यातील त्याची ५ विकेट तर प्रथम श्रेणी कारकिर्दीतील १००० वी विकेट साजरी केली. यापूर्वी अँड्र्यू कॅटिक या वेगवान गोलंदाजाने असा कारनामा अखेरचे २००५ साली केला होता.
वयाच्या १९ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण
अँडरसनने २००२ साली वयाच्या १९ व्या वर्षी लँकाशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने सरे संघाचा सलामीवीर इयान वॉर्डला बाद करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिली विकेट साजरी केली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २००३ साली अँडरसनला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
त्याने लॉर्ड्सवर झिम्बाब्वे विरुद्ध पदार्पण करताना ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यानंतर मात्र, अँडरसनने कारकिर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने मागीलवर्षीच कसोटीत ६०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
https://twitter.com/lancscricket/status/1412058623082123271
अँडरसनची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी
३८ वर्षीय अँडरसनने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत २१.६३ च्या सरासरीने लँकाशायरसाठी ३३९ विकेट्स घेतल्या. तर १६२ कसोटी सामन्यांत त्याने २६.६७ च्या सरासरीने ६१७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकूण २६२ प्रथम श्रेणी सामन्यांत १००२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ५१ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. (James Anderson takes 1000th first-class wicket)
एवढेच नाही तर २०१५ पासून वनडे क्रिकेट संघातून बाहेर असूनही अँडरसन वनडेत इंग्लंडचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितसह ‘हा’ खेळाडू असावा टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर, माजी खेळाडूने सुचविला पर्याय
टोकियो ऑलिंपिकसाठी भारताच्या ऍथलेटिक पथकात ‘या’ २६ खेळाडूंची निवड
भारताच्या इंट्रा-स्कॉड मॅचची क्षणचित्रे आली समोर, ‘या’ खेळाडूंनी दाखवला दम