सध्या भारत आणि इंग्लंड संघामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर बुधवारपासून (४ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. पण भारताची मधली फळी मात्र कोलमडली.
भारतीय सलामीवीरांनी केली चांगली सुरुवात
भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी ३७.३ षटकात ९७ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, रोहित ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचे मधली फळी कोलमडली. त्यातही इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने टाकलेले ४१ व्या षटकाने भारताला २ जबरदस्त धक्के दिले.
भारताच्या डावाच्या ४१ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर जेम्स अँडरसनने पुजाराला यष्टीरक्षक जॉस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. यावेळीही रिव्ह्यू घेण्यात आला. मात्र, रिव्ह्यू पुजाराच्या विरुद्ध गेला. त्यामुळे केवळ ४ धावा करुन पुजारा माघारी परतला. एवढेच नाही तर त्या पुढच्याच चेंडूवर अँडरसनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीला अँडरसनने शुन्यावर माघारी धाडले. पहिलाच चेंडू खेळणाऱ्या विराटचाही झेल बटलरने घेतला.
अँडरसनने चेंडू टाकलेल्या चेंडूवर विराटने बचाव करत बॅट पुढे केली. मात्र, चेंडू टप्पा पडून विराटच्या बॅटची कड घेऊ यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातात झेल गेला. जेव्हा विराट बाद झाला तेव्हा त्यालाही विश्वास बसला नाही. पण अँडरसनने विराटला बाद केल्यानंतर जोरदार जल्लोष साजरा केला.
अँडरसनने यापूर्वी २०१४ सालच्या दौऱ्यात विराटला हैरान केले होते. तर २०१८ सालच्या दौऱ्यात विराटने अँडरसनविरुद्ध चांगली कामगिरी करुन दाखवली होती. त्यामुळे यंदाच्या दौऱ्यातही विराट अँडरसनविरुद्ध कशी कामगिरी करणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे. सध्यातरी पहिल्या कसोटीत अँडरसन विराटवर भारी पडला आहे.
WOWWWW! 🔥@jimmy9 gets Kohli first ball and Trent Bridge is absolutely rocking!
Scorecard/Clips: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/g06S0e4GN7
— England Cricket (@englandcricket) August 5, 2021
भारतीय संघाची मधली फळी कोलमडली
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताची मधली फळी लवकर कोलमडली. चेतेश्वर पुजारा ४ धावांवर, विराट कोहली शुन्यावर, तर अजिंक्य रहाणे ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला, तेव्हा भारताने ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मुंबईकर खेळाडूच्या जागी कसोटी संघात हवा होता अश्विन,’ माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली नाराजी
वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा ‘वेसबर्ट ड्रेक्स’
रोहित शर्मा-केएल राहुलची विक्रमी भागीदारी, तब्बल १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये घडला झाला ‘तो’ पराक्रम