भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पाचवा कसोटी सामना शुक्रवार दिनांक १ जुलै पासून सुरू होणार आहे. आधीच भारतीय संघातून रोहित शर्मा कोरोनाच्या कारणामुळे संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे. अशातच भारताच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो. घोट्याच्या दुखापतीमुळे अँडरसन न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही विजयाची नोंद करून मालिका ३-० ने जिंकली.
अँडरसन बुधवारी म्हणाला की, “शेवटचा सामना (न्यूझीलंडविरुद्ध) गमावणे माझ्यासाठी निराशाजनक होते. संघ मैदानावर चांगला वेळ घालवत होता आणि चांगला खेळ करत होता. मला या आठवड्यात परत येण्याची आशा आहे. घोट्याची दुखापत आता बरी वाटत असून शुक्रवारी परत येण्याची आशा आहे.”
अँडरसनने ७ वेळा कोहलीला बाद केले आहे
अँडरसनचे संघात पुनरागमन झाल्यास भारतासाठी मोठे आव्हान असू शकते. तो इंग्लंडचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये अँडरसनने विराट कोहलीला खूप त्रास दिला आहे आणि त्याला आतापर्यंत ७ वेळा बाद केले आहे. शिवाय कोहली सध्या फारसा फॉर्ममध्ये नाही.
बेन फॉक्स देखील परत येऊ शकतो
अँडरसनशिवाय यष्टीरक्षक बेन फॉक्सही संघात पुनरागमन करू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत फॉक्स कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. सध्या, तो आता बर्मिंगहॅममधील संघात सामील झाला आहे आणि हलक्या सराव सत्रांचाही भाग आहे.
दरम्यान, एजबॅस्टन येथे शुक्रवारपासून सुरू होणारा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या मालिकेचा भाग आहे. भारतीय संघात कोविडची प्रकरणे समोर आल्यानंतर मालिका मध्येच थांबवावी लागली होती. या मालिकेत आतापर्यंत ४ सामने खेळले गेले असून भारतीय संघाकडे २-१ अशी अभेद्य आघाडी आहे. त्यामुळे भारत शेवटचा सामना जिंकत मालिका विजयासाठी प्रयत्नशील असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांनी सेल्फीसाठी विचारले, पण रिषभ पंतने जे केलं त्याचं होतयं कौतुक
“संजू सॅमसन रोहित शर्माच्या कॅटगिरीतील फलंदाज”
तब्बल ३६ वर्षानंतर एजबस्टन कसोटीमध्ये बुमराहमुळे घडू शकतो ‘तो’ योगायोग





