“संजू सॅमसन रोहित शर्माच्या कॅटगिरीतील फलंदाज”

"संजू सॅमसन रोहित शर्माच्या कॅटगिरीतील फलंदाज"

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.  त्याने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनने या सामन्यात स्वतःच्या शैलीत एकापेक्षा एक उत्कृष्ट शॉट्स खेळले, जे पाहून भारताचा माजी खेळाडू प्रभावित झाला. या दिग्गजाने त्याची तुलना सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Shrama) याच्याशी केली आहे.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर २२५ धावा केल्या. ही मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी सॅमसनने ४२ चेंडू खेळून ७७ धावांचे योगदान दिले. दीपक हुड्डाचे शतक आणि सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभी केली, पण आयर्लंडच्या खेळाडूंनी देखील कडवी झुंज दिली. शेवटच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. परंतु दुर्दैवाने स्ट्राईकवरील फलंदाजाला षटकार मारता आला नाही आणि भारताने ४ धावांनी विजय मिळवला.

आकाश चोप्रा (Aakash Chopra) स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना त्याने संजू आणि रोहित यांच्या फलंदाजीत खूप साम्य असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, “संजूला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचा पूर्ण फायदा उचलला. जेव्हा तो फलंदाजी करतो, तेव्हा खूप चांगल्या प्रकारे करतो. हे संजू सॅमसनचे वैशिष्ठ्य आहे. मी कधीच त्याला खराब खेळताना पाहिले नाहीये. तो असा खेळाडू आहे, जो रोहित शर्माच्या प्रकारातील आहे. रोहित देखील असाच खेळाडू आहे, जो जेव्हा खेळेल, तेव्हा खूप चांगल्या प्रकारे खेळतो. सहज धावा करतो आणि सामना नियंत्रित करतो.”

आयर्लंडविरुद्ध सॅमसनने त्याच्या खेळीचा पुरेपूर आनंद घेतला, असेही आकाश पुढे बोलताना म्हणाला. “त्याठिकाणीही संजूचे चाहते होते, कारण हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली आणि तो म्हणाला की, संजू खेळत आहे. त्यावेळी स्टेडियममध्ये खूप जल्लोष झाला. ही संजूसाठी खूप मोठी संधी होती, कारण त्याला सलामीवीर फलंदाजाच्या रूपात खेळण्याची संधी मिळाली होती,” असे आकाश चोप्रा म्हणाला.

दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेले नव्हते. परंतु दुसऱ्या टी-२० सामन्यात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे सहभागी झाला नाही आणि सॅमसनला सलामीवीराच्या रूपात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

ENGvsIND: “विराटने शतक केले नाही तरी चालेल, मात्र…” वाचा नक्की काय म्हणाला द्रविड

ENGvsIND: इंग्लंडच्या फलंदाजाविरोधात बुमराह ऍण्ड कंपनीची काय असेल रणनीती? वाचा सविस्तर

सनथ जयसूर्यासाठी वाढदिवस आहे खास, ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवलाय अव्वल क्रमांक

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.