जेम्स नीशम आयपीएल २०२०मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. यावेळी आयपीएलमधील त्याची कामगिरी चांगली होईल असे त्यानी म्हटले आहे. याशिवाय आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा फायदा आपल्याला मिळेल, असे त्यानी सांगितले. पुढे तो म्हणाला, “जेव्हा मी आयपीएलमध्ये आलो तेव्हा फारसे वय नव्हते परंतु आता त्याचा फायदा मलाही मिळेल.”
पीटीआयशी बोलताना जेम्स नीशम म्हणाला की, “बर्याच दिवसानंतर मी आयपीएलमध्ये खेळत आहे. येथे ‘वयाने मोठा’ खेळाडू म्हणून येणे खूप आनंददायक आहे. गेल्या वेळी मी आयपीएलमध्ये खेळताना तरुण आणि हुशार होतो पण मला खेळाविषयी फारशी माहिती नव्हती. यशासाठी काय आवश्यक आहे हे देखील मला माहित नव्हते आणि हे माझ्यासाठी एक आव्हान होते.”
जेम्स नीशम आनंदी
किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये ख्रिस गेल आणि केएल राहुलसारख्या दिग्गज खेळाडूंसह हा अष्टपैलू खेळाडू आनंदीत दिसत आहे. यापूर्वी तो आयपीएलमध्ये 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळला आहे. त्याला 2014 च्याच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याने केवळ चार सामने खेळले. दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाल्यानंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा तो अवघ्या 23 वर्षांचा होता. त्या काळाशी तुलना केल्यास त्याचे वय आणि अनुभव दोन्ही आज उपयुक्त ठरतील. किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी तो उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असू शकतो. तथापि, ग्लेन मॅक्सवेल असल्यामुळे नीशमसाठी ते सोपे जाणार नाही. वेगवान गोलंदाजाच्या जागेवर समावेश करून त्याला संधी दिली जाऊ शकते. यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब संघात अतिरिक्त फलंदाजही सामील होईल.