---Advertisement---

मलिंगाच्या जागी सहभागी झालेला बुमराहचा संघसहकारी म्हणतोय, बुमराह म्हणजे…

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 6:14 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन यावर्षी यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तेथील खेळपट्ट्या संथ गतीच्या आहेत. तसेच परिस्तिथी भारतीय परिस्थितीपेक्षा वेगळी आहे. अशा परिस्थितीत अनुभवी गोलंदाज संघात असणे आवश्यक आहे.

असे असतानाही यावर्षी आयपीएलमधून अनेक अनुभवी खेळाडूंनी माघार घेतली आहे. यात मुंबई इंडियन्सचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगचादेखील समावेश आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याला यूएईमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.

याच पॅटिन्सनने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा उल्लेख ‘सर्वोत्कृष्ट गोलंदाज’ असा केला आहे.

नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये तो म्हणाला, “बुमराहसोबत गोलंदाजी करायला मी उत्सुक आहे. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीमुळे मला संघात खेळायला आवडेल. मी याआधी यूएईमध्ये वनडे सामन्यात खेळलो आहे.”

यूएईमधील खेळपट्ट्यांबद्दल बोलतांना तो म्हणाला, “येथील खेळपट्ट्या कोरड्या आहेत. फक्त तीन खेळपट्ट्यांवर संपूर्ण आयपीएलचे सामने होणार आहेत. काही सामन्यानंतर खेळपट्ट्या आधिक संथ होईल. त्यामुळे चेंडू जास्ती उसळणार नाही.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---