भारतीय क्रिकेट संघाला या महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठीचा भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, त्याआधी दुलिप ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दिसणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडीसाठी ही स्पर्धा महत्त्वाचे मानली जातेय. भारतीय संघाची निवड होण्याआधी आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात कोणत्या वेगवान गोलंदाजांचा समावेश होणार याकडे सर्वांची नजर असेल. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या मालिकेत विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच मोहम्मद शमी हादेखील दुखापतग्रस्त असल्याने, तो देखील संघाचा भाग असण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज हा भारतीय वेगवान मारायचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत आकाश दीप व मुकेश कुमार हे दिसू शकतात. आकाश दीप याने दुलिप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात 9 बळी मिळवत या मालिकेसाठी दावेदार ठोकली.
असे असतानाच आता मालिकेआधी, जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज युद्धवीर चरक याला नेट बॉलर म्हणून संघाशी जोडल्याचे सांगितले जातेय. युद्धवीर हा 6 फूट 1 इंच उंचीचा गोलंदाज असून, 140 किमी इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. तो जम्मू-काश्मीरचा रहिवासी असला तरी, हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये त्याने यापूर्वी मुंबई इंडियन्स संघातून सुरुवात केली होती. मागील दोन हंगामापासून तो लखनऊ सुपरजायंट्स संघाचा सदस्य आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान 2021 नंतर प्रथमच कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणार आहे. तर दुसरा सामना कानपूर येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे हा 4 फुट उंचीचा पॅरा ॲथलीट, ज्यानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं?
24 वर्ष…एकही पराभव नाही! बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये भारताचा तुफानी रेकॉर्ड; आकडेवारी खूपच धक्कादायक
दुलीप ट्रॉफीमध्ये आरसीबीच्या गोलंदाजाचा कहर, पहिल्याच सामन्यात घेतल्या 9 विकेट