दक्षिण आफ्रिका संघात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले, ज्यांनी दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. यापैकीच एक खेळाडू म्हणजे एबी डिविलियर्स. मिस्टर ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्सने आपल्या फलंदाजीचा स्तर वेगळ्याच उंचीवर नेला आहे. त्याने चौफेर फटकेबाजी करत त्याने दक्षिण आफ्रिका संघाला अनेकदा विजय मिळवून दिले आहेत. परंतु एबी डिविलियर्सने निवृत्ती जाहीर केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ त्याचा पर्यायी फलंदाज शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
परंतु हा शोध आता संपला आहे. दक्षिण आफ्रिका संघाला असा एक फलंदाज मिळाला आहे, जो एबी डिविलियर्स सारखीच चौफेर फटकेबाजी करी शकतो. चला तर जाणून घेऊया कोण आहे तो फलंदाज?
दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाकडून क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान यांनी तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. दोघांनी मिळून २०० धावांची भागीदारी केली होती.
जानेमन मालनची तुफान फटकेबाजी
दक्षिण आफ्रिका संघाकडून आपला ७ वा वनडे सामना खेळत असलेल्या जानेमन मालनने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आहे. त्याची फलंदाजी पाहून चाहत्यांना असे भासू लागले आहे की, तो लवकरच दक्षिण आफ्रिका संघासाठी ते कार्य करणार आहे, जे गेली अनेक वर्षे एबी डिवीलियर्सने केले आहे. आयर्लंड संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने १६९ चेंडुंमध्ये नाबाद १७७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १६ चौकार आणि ६ षटकार लगावले होते.
जानेमन मालनची कारकीर्द
जानेमन मालनने आपल्या कारकीर्दीत एकूण ७ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १२०.७५ च्या सरासरीने ४८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि २ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच नाबाद १७७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तसेच ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २६.३३ च्या सरासरीने २३७ धावा केल्या आहेत. यात त्याला एक अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे.(Janneman Malan is perfect replacment for ab divilliers,click here to know more)
तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा विजय
मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना, जानेमन मालनच्या नाबाद १७७ आणि क्विंटन डी कॉकच्या १२० धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला ५० षटक अखेर ४ बाद ३४६ धावा करण्यात यश आले होते. दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या ३४७ धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाचा डाव ४७.१ षटकात २७६ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकन संघाने ७० धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.
महत्त्वाच्या बातम्या-
राशिद खानचा फलंदाजीत जलवा! टी२० सामन्यात ठोकला विचित्र षटकार, व्हिडिओ व्हायरल
नंबर १ ते ११, वनडेत प्रत्येक फलंदाजी क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे ‘हे’ आहेत फलंदाज