---Advertisement---

कॅलिसने निवडले वर्ल्डकपसाठी टॉप फाईव्ह खेळाडू! ‘ते’ एक नाव चकित करणारे

On: गुरूवार, सप्टेंबर 14, 2023 7:21 PM
---Advertisement---

भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी आता तीन आठवड्यांचा वेळ शिल्लक राहिला आहे. या विश्वचषकात जगभरातील दहा अव्वल संघ खेळताना दिसतील. विश्वचषकात या सर्व संघातील अनेक दिग्गज खेळाडूंवर सर्वांची नजर असेल. या विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असलेल्या पाच खेळाडूंची नावे नुकतीच दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस यांनी जाहीर केली आहेत.

भारतात जवळपास सव्वा महिने विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. प्रत्येक संघातील मान्यवर खेळाडूंवर सर्वांची नजर असेल. अशात काही खेळाडू असे असतील जे विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशी प्रभावी कामगिरी करू शकणाऱ्या खेळाडूंची नावे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस याने घोषित केली आहेत.

एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,

“आगामी विश्वचषकात माझी अनेक खेळाडूंवर नजर असणार आहे. त्यातही पाच असे खेळाडू आहेत जे उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. यामध्ये भारताचा विराट कोहली, अफगाणिस्तानचा राशिद खान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर व दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए यांचा समावेश आहे.”

असा रंगणार विश्वचषक

या तेराव्या विश्वचषकात एकूण दहा संघ सहभागी‌ होणार आहेत.‌ स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना पाच ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. भारतातील विविध दहा स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. इंग्लंड संघ स्पर्धेच्या गतविजेता असून, यावेळी भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांना विजेतेपदासाठी पसंती दिली जात आहे.

(Jaques Kallis Picks Five Players For 2023 ODI World Cup)

हेही वाचा-
नाद करा पण रिंकूचा कुठं! 180पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने पाडला धावांचा पाऊस, संघाचा दणदणीत विजय 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---