Jason Gillespie On Pat Cummins: ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल 2024 लिलावात चांगलेच मालामाल झाले. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेल स्टार्क याला 24.75 कोटी रुपयात ताफ्यात घेतले. तसेच, सनरायझर्स हैदराबाद संघाने पॅट कमिन्स याच्यासाठी 20.50 कोटी रुपये मोजले. आयपीएलमध्ये 20 कोटींचा आकडा पार करणारा कमिन्स पहिला खेळाडू बनला होता. मात्र, नंतर स्टार्कने त्याला मागे सोडले. असे असले, तरीही कमिन्सला घरचा आहेर मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जेसन गिलेस्पी याने प्रश्न उपस्थित केला आहे की, कमिन्स या प्राईज टॅगचे समर्थन करू शकणार नाही.
काय म्हणाला गिलेस्पी?
माजी क्रिकेटपटू जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “पॅट कमिन्स स्पष्टरीत्या एक उच्च दर्जाचा गोलंदाज आहे आणि एक गुणवत्तापूर्ण नेतृत्वकर्ता आहे. आपण हे पाहिले आहे. मात्र, मला वाटत नाही की, टी20 त्याचा सर्वोत्तम क्रिकेट प्रकार आहे. मला वाटते की, तो वैयक्तिकरीत्या एक कसोटी गोलंदाज आहे. मला वाटते, कसोटी क्रिकेटच त्याची संपूर्ण उपजीविका आहे. तो एक चांगला टी20 गोलंदाज आणि तो चुका करत नाही, पण माझ्यासाठी हा प्राईज टॅग खूप मोठा आहे.”
भूतकाळात कमिन्स टी20 क्रिकेटविषयी टीका करत आला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कमिन्स नक्कीच जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र, त्याची गोलंदाजी शैली टी20 क्रिकेट प्रकारासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. त्याने आपल्या वनडे डेथ बॉलिंगमध्ये सुधारणा केली आहे, पण हे पाहणे बाकी आहे की, तो टी20 क्रिकेट प्रकारातही हे लागू करू शकतो की नाही. त्याने स्वत: वनडे विश्वचषक 2023 दरम्यान म्हटले होते की, “मला असे वाटते की, मी टी20 क्रिकेट जास्त खेळलो नाहीये आणि काही बाबतीत मला वाटते की, मी काही काळापासून माझे सर्वोत्तम टी20 क्रिकेट खेळलो नाहीये.”
कमिन्सची आयपीएल कारकीर्द
पॅट कमिन्स (Pat Cummins) याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 42 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 8.54च्या इकॉनॉमी रेटने 45 विकेट्स घेतल्या आहेत. चकित करणारी बाब म्हणजे, तो आयपीएलमध्ये फलंदाजी करताना वेगवान अर्धशतक करणारा फलंदाजही आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार असलेल्या कमिन्सने अखेरचा टी20 सामना 2022च्या टी20 विश्वचषकादरम्यान खेळला होता. आता तो जून 2024मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. अशात त्याला मोजक्याच टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. (jason gillespie questions pat cummins ability to justify 20 crore 50 lakhs price tag in ipl 2024 says this read)
हेही वाचा-
‘जर रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार असता, तर मी…’, सुरेश रैनाचं स्टेटमेंट तुफान व्हायरल
रोहितला हटवून पंड्याला कर्णधार बनवण्याविषयी ग्लोबल हेडचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘खरं सांगतो, हे खूपच…’