मॅन्चेस्टर| ऑस्ट्रेलिया विरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणार्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या संघात स्फोटक फलंदाज जेसन रॉयचा समावेश केला आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “डेव्हिड मलान वनडे मालिकेसाठी राखीव खेळाडू असेल.”
मलानने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत सर्वाधिक 129 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ईसीबीने असेही म्हटले आहे की, “जो डेंली हा देखील राखीव खेळाडू होता, परंतु तो जैव सुरक्षित बबलमधून बाहेर आला आणि केंटमध्ये परतला.”
तसेच अनेक महिन्यांनंतर इंग्लंडकडून जो रुट वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्याचे इंग्लंडच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडचे या मालिकेत नेतृत्व इऑन मॉर्गन सांभाळणार आहे.
इंग्लंड वनडे संघः इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, टॉम बंटन, सॅम बिलिंग्ज, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वॉक्स, मार्क वूड.
राखीव: साकीब महमूद, डेव्हिड मलान, फिल सॉल्ट.
ऑस्ट्रेलिया संघ: आरोन फिंच (कर्णधार), सीन bबॉट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (उप-कर्णधार), जोश हेझलवुड, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.