---Advertisement---

दुखापतग्रस्त रॉयचा जज्बा! सामन्यानंतर वॉकर घेऊन येत केले आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 4:12 PM
---Advertisement---

टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आमनासामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडवर १० धावांनी मात केली. मात्र, तरीदेखील अफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ग्रुप दोनमध्ये यापूर्वी इंग्लंडने उपांत्या सामन्यात स्थान पक्के केले आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने नेट रन रेटच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली आहे. इंग्लंडने सामना तर गमावलाच, पण त्यांचा महत्वाचा खेळाडू जेसन रॉय दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाची चिंता जास्त वाढली आहे. असे असले तरी, सामन्यानंतर रॉयने केलेल्या एका गोष्टीमुळे चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहे.

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज या सामन्यात धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला. त्याला धावा घेताला अडचण येत होती. फलंदाजी करत असताना त्याच्या पायांच्या स्नायूंमध्ये ताण आल्यासारखे वाटत होत. रॉयने फलंदाजी करताना १५ चेंडूत २० धावा केल्या होत्या. पण, अचानक त्याच्या स्नायूंमध्ये ताण आला आणि तो मैदानावर झोपला. मैदानावर त्याला तीव्र वेदना होत असल्याचे दिसले. त्याला खेळाडूंना पकडून नीट चालताही येत नव्हते, यादरम्यान त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. इंग्लंडसाठी दक्षिण अफ्रिकेसोबतचा सामना जास्त महत्वाचा नसला तरी, यानंतर होणारा उपांत्य सामना मात्र संघासाठी महत्वाचा आहे. अशात आता रॉय उपांत्य सामन्यात खेळेल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

रॉयला प्रचंड वेदना होत असल्या तरीही, जेव्हा दक्षिण अफ्रिकेने सामना जिंकला आणि सर्व खेळाडू एकमेकांसोबत हास्तांदोलन करत होते, तेव्हा रॉयदेखील मैदानात विरोधी संघाच्या खेळाडूंसोबत हात मिळवण्यासाठी आला. रॉयल व्यवस्थित चालता येत नसल्यामुळे एका काठीची (walking stick) मदत घेऊन तो मैदानात आला होता. रॉयने दाखवलेल्या या खेळाडू वृत्तीचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. चाहते त्याच्या खेळाडू वृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे आणि लवकर तंदुरुस्त होण्यासाठी त्याला शुभेच्याही दिल्या आहेत.

दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली आणि २० षटकात दोन विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या रॅसी वॅन डर डुसेनने ६० चेंडूत ९४ धावांची महत्वाची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडने २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा केल्या. परिणामी दक्षिण अफ्रिकेने सामन्यात १० धावांनी विजय मिळवला. डुसेनला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर निवडले गेले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---