Loading...

विश्वचषकातील इंग्लंडच्या या स्टार खेळाडूला आता कसोटी पदार्पणाचीही संधी

2019 विश्वचषकानंतर आता इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. त्यांचा 24 ते 27 जूलै दरम्यान आयर्लंड विरुद्ध एकमेव चार दिवसीय कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने काल(17 जूलै) 13 जणांचा संंघ जाहीर केला आहे. या संघात इंग्लंडने पहिल्यांदाज जेसन रॉयला कसोटी संघात संधी दिली आहे.

Loading...

रॉयने नुकत्याच पार पडलेल्या 2019 विश्वचषकात इंग्लंडकडून चांगली कामगिरी केली होती. त्याने या विश्वचषकात खेळलेल्या 7 डावात मिळून 63.28च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 1 शतकाचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

आयर्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यामुळे रॉयला इंग्लंडच्या निवड समीतीला 1 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या ऍशेस मालिकेआधी प्रभावित करण्याची संधी मिळणार आहे.

त्याचबरोबर इंग्लंडने बेन स्टोक्स आणि जॉस बटलरला या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. तर मार्क वूडला साईड स्ट्रेनच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने त्याला पुढील 4 ते 6 आठवडे विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्याला या सामन्याला मुकावे लागणार आहे.

Loading...

तसेच रॉय प्रमाणेच लेविस ग्रेगॉरीलाही पहिल्यांदाच इंग्लंडच्या कसोटी संघात संधी मिळाली आहे. त्याने कौउंटी क्रिकेटमध्ये सोमरसेट संघाकडून खेळताना या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्याने या मोसमात 44 विकेट्स आणि 363 धावा केल्या आहेत.

आयर्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यासाठी ऑली स्टोनलाही इंग्लंडने कसोटी संघात संधी दिली आहे. याबरोबर या संघाचे नेतृत्व जो रुट करणार असून स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन अशा अनुभवी खेळाडूंचाही या संघात समावेश आहे.

याबरोबरच इंग्लंडने ऍशेस मालिकेच्या तयारीसाठी या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ट्रेनिंग कॅम्पसाठीही 16 जणांचा संघ जाहिर केला आहे.

Loading...
Loading...

आयर्लंड विरुद्धच्या चार दिवसीय कसोटी मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ –

जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, सॅम करन, जो डेन्ली, लेविस ग्रेगॉरी, जॅक लीच, जेसन रॉय,ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.

ऍशेस मालिकेसाठीच्या तयारीसाठी होणाऱ्या ट्रेनिंग कॅम्पसाठी इंग्लंडचा संघ – 

मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, सॅम करन, जो डेन्ली, लेविस ग्रेगॉरी, जॅक लीच, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अंतिम सामन्यानंतर सचिन तेंडुलकर केन विलियम्सनला असे म्हणाला…

हे तीन दिग्गज निवडणार टीम इंडियासाठी नवीन कोच?

विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मनिष पांडे, कृणाल पंड्याची चमकदार कामगिरी

You might also like
Loading...