---Advertisement---

इंग्लंडला सेमीफायनलपूर्वी जबर धक्का! जेसन रॉय गेला स्पर्धेबाहेर; ‘हा’ टी२० स्पेशालिस्ट संघात सामील

---Advertisement---

इंग्लंडच्या संघाने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शानदार कामगिरी करून उपांत्य फेरीत धडक दिली. साखळी फेरीतील पाच पैकी चार सामने जिंकून संघ अ गटातून अव्वलस्थानी राहिला. त्यांना बुधवारी (१० नोव्हेंबर) पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळावे लागेल. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्याआधी इंग्लंड संघाला जबर हादरा बसला असून, संघाचा अनुभवी सलामीवीर जेसन रॉय विश्वचषकातून बाहेर गेला आहे.

अखेरच्या सामन्यात झालेला दुखापतग्रस्त
इंग्लंडच्या विश्‍वचषक मोहिमेचा महत्त्वपूर्ण भाग असलेला जेसन रॉय अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता. तो फलंदाजी करताना जखमी झाल्याने लंगडत मैदानाबाहेर गेलेला. सामना संपल्यावर तो चक्क वॉकर घेऊन मैदानात दाखल झालेला. सोमवारी (८ नोव्हेंबर) त्याच्या या दुखापतीचा वैद्यकीय अहवाल समोर आला. यामध्ये त्याच्या मांडीचा स्नायू फाटला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही.

रॉय याने स्पर्धेत पाच सामने खेळताना १२३ धावा केल्या होत्या. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. इंग्लंड संघासाठी त्याच्यापेक्षा अधिक धावा केवळ जोस बटलरने बनविल्या आहेत.

हा खेळाडू आला बदली म्हणून
जेसन रॉय स्पर्धेबाहेर झाल्याने त्याच्या जागी सलामीवीर जेम्स विन्स याला इंग्लंड संघात समाविष्ट करण्यात आले आहे. जेम्स विन्स हा टी२० चा आदर्श खेळाडू मानला जातो. तो यापूर्वीच संघासह राखीव खेळाडू म्हणून जोडला गेलेला आहे. ३० वर्षीय विन्स इंग्लंडसाठी आतापर्यंत १२ टी२० सामने खेळला असून, यामध्ये २८.३० च्या सरासरीने त्याने ३४० धावा केल्या आहेत. बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स तर द हंड्रेड लीगमध्ये सदर्न ब्रेव या संघांना विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा राहिला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारतीय संघ चांगल्या हाती आहे’, म्हणत विराटने दिले पुढील भारतीय टी२० कर्णधाराबाबत संकेत

https://mahasports.in/t20-wc-2021-indvnab-live-namibia-20-overs-8-out-132-runs/

जाता-जाता शास्त्री गुरूजींनी फोडला बॉम्ब! म्हणाले, “आयपीएलमूळे विश्वचषकात…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---