इंग्लंड क्रिकेट मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्या खेळाडूंमुळे चर्चेत आहे. लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी इंग्लंडचे काही प्रमुख केळाडू राष्ट्रीय संघासोबतचा करार मोडण्याच्या तयारीत आहे, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. नुकतीच अशी माहितीही समोर आली की, इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय अमेरिकेत यावर्षीपासून सुरू होणाऱ्या मेजर लीगमध्ये खेळणार आहे. यासाठी तो राष्ट्रीय संघासोबतचे नाते तोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते. आता या सर्व चर्चांना रॉयने स्वतः एक पोस्ट शेअर करून पूर्णविराम लावला.
अमेरिकेत यावर्षीपासून मेजर लीग क्रिकेट स्पर्षा सुरू होत आहेत. या लीगमध्ये एकूण 6 संघ सहभाग घेणार आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार जेसन रॉय (Jason Roy) या लीगमध्ये लॉस ऍन्जलिस नाईट रायडर्स संघाकडून खेळू शकतो. या फ्रँचायझीकडून रॉयला दोन वर्षांच्या करारासाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्तान मिळाल्याचेही बोलले जात होते. माध्यमांमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणाच चर्चा सुरू झाल्यानंतर रॉयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट सेअर करत याविषयी माहिती दिली. सलामीवीराने आपण इंग्लंड क्रिकेटची साथ सोडणार नसल्याचे या पोस्टमधून स्पष्ट केले.
“मला मागच्या 24 तासांमध्ये काही अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मी सांगू इच्छितो की, मी ‘इंग्लंड क्रिकेट सोडत नाहीये.’ मेजर लीगमध्ये सहभाग घेण्याविषयी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी मी सविस्तर बोललो होतो. ईसीबीही मी या लीगमध्ये खेळत असल्याने आनंदी होती. पण हे सर्व राष्ट्रीय संघाच्या कारारासाठी राहिलेल्या वर्षीचा मोबदला मला देण्यापूर्वी झाले. एक प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मला अपेक्षा आहे की, मी इंग्लंड संघासाठी येत्या अनेक वर्षांपर्यंत खेळत राहील आणि हीच माझी प्रथमिकता असेल.”
Please read. pic.twitter.com/FrKWhUn1aM
— Jason Roy (@JasonRoy20) May 25, 2023
“कोणताही राष्ट्रीय करार नसताना मी लीगमध्ये खेळू इच्छित होतो. कारण सध्या इंग्लंड संघालाही कोणता नियोजित मालिका खेळायची नाहीये. इंग्लंडचा खेळाडू म्हणून जितके शक्य आहे तितके क्रिकेट खेळतो आणि याचा मला आनंदही आहे. स्पष्ट सांगाचये तर माझी प्राथमिकता इंग्लंड क्रिकेट आहे. आम्हाला येत्या काळात विश्वचषक खेळायचा आहे. आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकणे हे माझ्यासह कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सन्मानाची गोष्ट आहे.”
दरम्यान, जेसन रॉय यावर्षी आयपीएलमध्येही खेळला. कोलकाता नाईट रायडर्ससाठी त्याने 8 सामन्यांमध्ये 285 धावा केल्या. यात त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश होते. केकेआर संघासाठी रॉयची भूमिका या आयपीएल हंगामात महत्वाची राहिली होती. असात येत्या काळात रॉय लॉस ऍन्जलिस नाईट रायडर्स संघासाठी खेळणार की नाही, हे पाहण्यासारखे असेल. हा निर्णय रॉयसोबतच बऱ्यापैकी ईसीबीच्या हातातही असणार आहे. (Jason Roy will continue to play cricket for England, the opening batsman clarified the rumours)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL संपल्यानंतर अफगाणिस्तानला जाता जाता गंभीरविषयी ‘हे’ काय बोलून गेला नवीन, एक नजर टाकाच
धक्कादायक Video : जीवापेक्षा तिकीट महत्त्वाचं? GTvsMI सामन्याच्या तिकिटासाठी स्टेडिअमबाहेर चेंगराचेंगरी