भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना सध्या केप टाऊनमध्ये खेळला जात आहे. केप टाऊन कसोटीत पहिल्या दोन दिवसांमध्ये गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. दोन्ही संघ सामन्याच्या पहिल्या डावात अपेक्षित धावसंख्या गाठू शकले नाहीत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) याने पहिल्या डावात अप्रतिम प्रदर्शन केले.
पहिल्या दिवशी भारतीय संघ सर्वबाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने संघासाठी पहिली वेकट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी त्याने दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला तंबूत पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुमराहाने चार विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या. यामध्ये एडन मार्करम, मार्को जेन्सन, किगन पीटरसन आणि लुंगी एन्गिडी यांच्या विकेट्सचा समावेश आहे. एकंदरित पाहता बुमराहने पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या मिळून पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. या कामगिरीनंतर तो विदेशात भारतीय संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या गोलंदाजांमध्ये सहभागी झाला आहे.
व्हिडिओ पाहा-
विदेशात खेळताना एका डावात पाच विकेट्स घेण्याचा कारनामा सर्वाधिक वेळा करणाऱ्यांमध्ये जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर कपिल देव आहेत. त्यांनी विदेशात कसोटी सामने खेळताता १२ वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर इशांत शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ही कामगिरी ९ वेळा केली आहे. तिसऱ्या क्रिमांकावर दिग्गज जहीर खान आहे. जहीरने ८ वेळा विदेशात एका डावात पाच कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराह या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे आणि त्याने ही कामगिरी ७ वेळा केली आहे. इरफान पठाण त्याच्यासह या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे, त्यानेही ७ केळा ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा- हिशोब बरोबर! मागच्या सामन्यात झालं होतं भांडण, आता बुमराहने ‘लेजर’ बॉलवर जेन्सनच्या उडवल्या दांड्या
दक्षिण अफ्रिकेत कसेटी सामना खेळताता बुमराहने एका डावात पाच विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी दक्षिण अफ्रिकेत कसोटी सामने खेळताना तीन वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी, वेंकटेश प्रसाद आणि एस श्रीसंत यांनी देखील दक्षिण अफ्रिकेत प्रत्येकी दोन वेळा ही कामगिरी केली आहे.
दरम्यान, बुमराहने या सामन्याच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्यामुळे दक्षिण अफ्रिका संघ मर्यादित धावसंख्येवर गुंडाळला गेला. भारताने पहिल्या डावात २२३ धावा केल्या होत्या, त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघही अवघ्या २१० धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात भारताने १३ धावांची माफक आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
शमीसाठी चक्क अंपायरशी भिडला कर्णधार कोहली, गोलंदाजी करताना दिली होती वॉर्निंग
‘ताली मारते रहो’; शमीच्या एका षटकातील डबल धमाक्याचं कर्णधाराकडून कौतुक, करून घेतला टाळ्यांचा गजर
व्हिडिओ पाहा –