---Advertisement---

‘सुट्टी असल्यासारखं वाटतंय’, म्हणत पूर्ण हंगाम बाकावर बसवलेल्या बीबीएल संघाची उन्मुक्तने उडवली खिल्ली

unmukt-Chand
---Advertisement---

भारताचा माजी खेळाडू उन्‍मुक्‍त चंद (Unmukt Chand) याने राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तो अमेरिकेला गेला आहे. यादरम्यान त्याने मेलबर्न रेनेगेड्ससोबत बीग बॅश लीगमध्ये करार केला, जिथे त्याला पूर्ण हंगामात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने बीग बॅश लीगमधील आपल्या संघाला टोमणा (Unmukt Takes Dig On BBL Team) मारला आहे.

२०१२ च्या ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धेत भारतीय अंडर-१९ संघाला चॅंपियन बनवणारा उन्‍मुक्‍त चंद देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधेये संधी न मिळाल्यामुळे निराश झाला आणि अमेरिकेत जावुन खेळण्याचा निर्णय घेतला. तेथुन तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न करत आहे.

व्हिडिओ पाहा-

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

तेव्हा उन्‍मुक्‍त चंदने इतिहास रचला होता, जेव्हा तो बीबीएलसोबत करार करणारा पहिला पुरुष खेळाडु ठरला होता. चंदने मेलबर्न रेनेगेड्ससोबत करार केला होता. चंदने जेव्हा करार केला होता तेव्हा म्हटलं होत की, “मला बीबीएल पहायला आवडते आणि तेथे जगभरातुन क्रिकेटर्स खेळायला येतात .ही एक शानदार स्पर्धा आहे आणि मला नेहमीच येथे खेळायचे होते. पुढील वर्षांमध्ये मी माझे लक्ष केंद्रित करेन आणि मी ज्या संघासाठी खेळतो त्या संघाला विजेतेपद मिळवुन देण्यासाठी मदत करत राहीन.”

तो पुढे म्हणाला होता की, “मला नेहमीच ऑस्ट्रेलियात खेळायला आवडते. मी मेलबर्नमध्ये राहिलो नाही. मला माहीत आहे मेलबर्नमध्ये खुप भारतीय राहतात. तर ते चांगले होईल. मला आशा आहे की, लोक येथे येवुन सामना पाहतील.”

हेही वाचा- उन्मुक्त चंदनंतर आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर करत सोडला देश; आता अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट

परंतु उन्‍मुक्‍त चंदने मेलबर्न रेनेगेड्ससोबत अद्याप एकही सामना खेळलेला नाही. संघाने ११ पैकी ७ सामने गमावले आहेत. तथापी बीबीएल लीगमध्ये अनेक कोविडची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे फ्रँचायझी वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देताना दिसत आहेत. यावर निराश होत उन्‍मुक्‍त चंदने मेलबर्न रेनेगेड्सची खिल्ली उडवत ट्विट केले आहे की, “सुट्टी असल्यासारखे वाटत आहे. धन्यवाद मेलबर्न!”

दरम्यान, २८ वर्षीय चंदने आपल्या कारकीर्दीची सुरुवात अमेरिकेत माइनर लीग खेळुन केली. तिथे त्याने त्याच्या संघाला सिलीकॅान व्हॅलीचे विजेतेपद मिळवून दिले. तसेच २०१० मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या चंदने आत्तपर्यंत ७७ टी२० सामने खेळले असुन २२.३५ च्या सरासरीने आणि ११६.०९ च्या स्ट्राइक रेटने १५६५ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

लखनऊ, अहमदाबाद फ्रँचायझींचा अधिकृत मंजूरी, पण खेळाडू निवडण्यासाठी मिळणार किती वेळ? घ्या जाणून

कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल, स्मिथने चँपियन कर्णधार विलियम्सनला पछाडले; तर जेमिसनचीही मोठी झेप

हे काय? कॅच सुटला, मग चेंडू मैदानावरील हेल्मेटला धडकला अन् द. आफ्रिकेला फुकटात मिळाल्या चक्क ५ धावा

हेही पाहा-

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---