सर्वात यशस्वी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सला चालू हंगामात अजून एकही विजय मिळालेला नाहीये. संघाने चार सामने गमावले असून त्यांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघातील नवीन खेळाडूंना काही सल्ले दिले आहेत. बुमराहच्या मते खेळाडूंनी वर्तमान परिस्थितीनुसार स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे.
जसप्रीत बुमराह (Jasprut Bumrah) भारतीय संघाचा उपकर्णधार आहे आणि मुंबई इंडियन्ससाठी त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाचा सर्वात महत्वाचा गोलंदाज देखील. आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावानंतर सर्व संघांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे आणि मुंबई इंडियन्सची परिस्थितीही तशीच काहीशी आहे. बुमराहच्या मते मुंबई इंडियन्स संघ सध्या बदलाच्या काळातून जात आहे आणि नवीन खेळाडूंनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. युवा खेळाडूंनी दबावाच्या परिस्थितीतून बाहेर निघायला शिकले पाहिजे.
मुंबई इंडियन्समध्ये घडत आहेत बदल
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला चालू आयपीएल हंगामात चांगल्या गोलंदाजांची कमतरता भासत आहे. बुमराहच्या मते, “हा बदलांचा काळ आहे आणि प्रत्येक संघाला अशा परिस्थितीतून जावे लागते. प्रत्येक क्रिकेटपटूला यातून जावे लागते. संघात अनेक नवीन खेळाडू आहेत आणि आम्ही अशाच परिस्थितीतून जात आहोत. आयपीएलमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला दबावाचा सामना करायला शिकले पाहिजे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
पुढे बोलता तो म्हणाला की, “झालेल्या गोष्टी सोडून आता आपल्याला वर्तमानात राहावे लागेल. हे बरोबर आहे की, गोष्टी आतापर्यंत नियोजनाप्रमाणे घडल्या नाहीत, पण आपण संघर्ष करत असतो आणि यशाचा मार्ग शोधत असतो. या आयपीएल हंगामात नाणेफेक जिंकणारा संघ शक्यतो विजयी होत आला आहे.” याविषयी बोलताना बुमराह म्हणाला, “जर ही गोष्ट माझ्या हातात असती, तर प्रत्येक सामन्यात मला नाणेफेक जिंकायची आहे. नाणेफेक खरोखर मदत करत आहे.”
दरम्यान, मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२ मधील प्रदर्शन पाहिले, तर ते खूपच निराशाजनक राहिले आहे. मुंबईते हंगामातील त्यांचे सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. संघाचा इतिहास पाहिला, तर अनेकदा त्यांनी हंगामाच्या सुरुवातीला खराब प्रदर्शन करून देखील प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. अशात चालू आयपीएल हंगामात देखील संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘धोनी ओपनिंग करून संघाला संकटातून काढू शकतो बाहेर’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे विधान
‘बोल, कधी सोडतोय नोकरी’, हार्दिकची फिफ्टी झाल्यावर नोकरी सोडणार म्हटलेला कार्यकर्ता जोरात ट्रोल
‘श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंनी आयपीएलसोडून मायदेशी परत यावे’, अर्जुन रणतुंगा यांची साद