---Advertisement---

बुमराह आणि मंधानाची विजडनकडून सर्वोच्च क्रिकेटपटू म्हणून निवड, आणखी कोणत्या खेळाडूंना मिळाला सन्मान?

On: मंगळवार, एप्रिल 22, 2025 1:54 PM
---Advertisement---

विजडनने दुनियातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर खेळाडूंची घोषणा केली आहे. 2024 वर्षासाठी भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह या दोघांना हा सन्मान देण्यात आला आहे. तसेच टी20 मध्ये हा सन्मान वेस्टइंडीजचा यष्टीरक्षक निकोलस पुरणला सुद्धा देण्यात आला आहे.

जसप्रीत बुमराह‌ आज क्रिकेटच्या विश्वातील सर्वोत्तम क्रिकेटपटू गोलंदाज खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत 45 कसोटी सामन्यांमध्ये 19.40 च्या सरासरीने 204 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 89 वनडे सामनांमध्ये त्याने 149 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 70 सामने खेळून त्यामध्ये 297 विकेट्स घेतल्या आहेत.

स्मृती मानधनाने हा पुरस्कार दुसऱ्या वेळेस जिंकला आहे. याआधी सुद्धा 2018 मध्ये ती विजडन क्रिकेटर ऑफ द इयर राहिलेली आहे. स्मृतीने 2024 मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये 1600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. स्मृतीला विजडनने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू मानले आहे. तिने एकूण 1659 धावा केल्या आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात कोणत्याही खेळाडूकडून केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

तसेच वेस्टइंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरण बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2024 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये 142 च्या सरासरीने 464 धावा केल्या आहेत. त्याने 21 सामन्यात 464 धावा केल्या आहेत.

विजडनने या तीन खेळाडूंशिवाय पाच सर्वश्रेष्ठ खेळाडूंना निवडले आहे. यामध्ये गस एटकिंसन, लियाम डॉसन,सोफी एक्लेस्टोन, जेमी स्मिथ आणि डैन वॉरॉल यांचा समावेश आहे.

विजडन पुरस्कार क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये एक आहे. प्रत्येक वर्षी हा पुरस्कार सर्वोत्तम क्रिकेटपटूंना दिला जातो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---