आयपीएल 2023चा 35 वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. उभय संघांतील या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यात तो आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला.
Bumrah supporting Mumbai Indians in Narendra Modi Stadium. pic.twitter.com/YG6JD9X4Tn
— Johns. (@CricCrazyJohns) April 25, 2023
जसप्रीत बुमराह मागील नऊ ते दहा महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याने सप्टेंबर 2022 पासून एकही सामना खेळलेला नाही. त्याआधी देखील तो भारतीय संघातून बाहेर होता. त्याच्या पाठीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून, त्यामुळे आयपीएलमध्ये देखील तो सहभागी होऊ शकला नाही. त्याच्यामुळे मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणातील अनुभव कमी झाला आहे. अशा परिस्थितीत बुमराह आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे आला.
बुमराह मागील 10 वर्षापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच त्याने भारतीय संघात आपली जागा बनवली होती. त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की, त्याची या स्पर्धेतील कामगिरी कोणत्या दर्जाची राहिली आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत केवळ मुंबई इंडियन्ससाठी खेळतानाच 120 सामन्यांमध्ये 145 बळी मिळवले आहेत. मुंबईने मिळवलेल्या पाचही आयपीएल विजेतेपदात त्याची भूमिका महत्त्वाची राहिली होती.
मुंबई इंडियन्सच हंगामातील कामगिरी पाहिल्यास पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाल्याने त्यांची सुरुवात खराब झालेली. मात्र, त्यानंतर सलग तीन सामने जिंकत त्यांनी विजयी लय मिळवली. पंजाब किंग्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता.
(Jasprit Bumrah Attend Gujarat Titans Versus Mumbai Indians Match In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागच्या 10 डावात 11च्या सरासरीने धावा करूनही राहुल खेळणार डब्ल्यूटीसी फायनल! निवडकर्त्यांचा निर्णय कितपत योग्य?
GTvsMI । नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, पण महत्वाचा खेळाडू सामन्यात बाहेर