‘जस्सीसारखा कोणीच नाही’ पुन्हा एकदा या स्टार गोलंदाजाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहच्या विध्वंसक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाला बळी पडावे लागले आहे. पहिल्या डावात 4 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावातही तितक्याच विकेट घेतल्या. या दरम्यान त्याने क्रिकेटच्या या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये 200 विकेट्सही पूर्ण केल्या. बुमराहने कसोटीत विकेटचे द्विशतक पूर्ण करून इतिहास रचला आहे. त्याने सर्वात कमी सरासरीने 200 बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे.
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या 44 सामन्यांमध्ये 19.38 च्या सरासरीने 202 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळींचा टप्पा गाठणारा तो पहिला गोलंदाज आहे. होय, बुमराहने या प्रकरणात माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली ॲम्ब्रोस या दिग्गज गोलंदाजांचा मागे टाकला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीने 200 बळी
जसप्रीत बुमराह – 19.38
माल्कम मार्शल – 20.09
जोएल गार्नर – 21
कर्टली ॲम्ब्रोस – 21
जसप्रीत बुमराह हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 200 बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने 44 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. ऑल ओव्हर रेकॉर्डबद्दल बोलायचे तर आर अश्विन 39 सामन्यांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराह सर्वात कमी चेंडूत 200 कसोटी बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस, डेल स्टेन आणि कागिसो रबाडा या महान खेळाडूंच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे.
सर्वात जलद 200 कसोटी बळी (चेंडूद्वारे)
वकार युनूस- 7725
डेल स्टेन – 7848
कागिसो रबाडा – 8153
जसप्रीत बुमराह – 8484
तसेच बुमराहच्या आता एमसीजीमध्ये 23 विकेट्स आहेत. जे गेल्या 110 वर्षांत या मैदानावर पाहुण्या गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट आहेत.
हेही वाचा-
IND vs AUS: नितीश रेड्डी कसोटीत हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू, 6 डावातच रचला इतिहास
जसप्रीत बुमराहने घेतला बदला, सॅम कोन्स्टासच्या दांड्या गुल, बुम-बुमचे हटके सेलिब्रेशन; VIDEO
पावसामुळे मेलबर्न कसोटीची मजा खराब होईल? पुढील 2 दिवसाचं हवामान जाणून घ्या