---Advertisement---

अरेच्च्या! राहुलच्या ‘मॅच विनिंग’ खेळीनंतर बुमराहला आली शंका, तपासली बॅट; फोटो होतोय व्हायरल 

Bumrah Checked Rahul Bat
---Advertisement---

केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्ज संघाने दणदणीत विजयासह आयपीएल २०२१ श्रीगणेशा केला होता. त्यांनी राजस्थान रॉयल्सला आपल्या हंगामातील पहिल्याच लढतीत ४ धावांनी पराभूत केले होते. परंतु पुढील सलग ३ सामन्यात त्यांच्या हाती अपयश आले. मात्र शुक्रवारी (२३ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार राहुलने ‘मॅच विनिंग’ खेळी केली आणि हंगामातील दुसरा विजय नोंदवला.

सलामीला फलंदाजीस येऊनही सामन्याखेर नाबाद राहिलेल्या राहुलची फटकेबाजी पाहून मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही दंग झाला. सामन्यानंतर त्याने स्वत: राहुलकडे झात फार दुर्मिळ पाहायला मिळणारी कृती केली.

तर झाले असे की, मुंबईच्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचा कर्णधार राहुल आणि मयंक आगरवाल सलामीला फलंदाजीसाठी आले होते. या जोडीने डावातील सातव्या षटकापर्यंत अर्धशतकी भागिदारी केली. त्यापुढील षटकात अगरवाल राहुल चाहरच्या चेंडूवर झेलबाद झाला. परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ख्रिस गेलसोबत मिळून राहुलने संघाचा डाव पुढे नेला.

सामन्याखेर ५२ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ६० धावांची मॅच विनिंग खेळी त्याने केली. त्याच्या या शानदार खेळीमुळे १७.४ षटकातच पंजाबने ९ विकेट्स राखुन मुंबईवर मात केली.

दरम्यान मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज बुमराहने ३ षटके गोलंदाजी केली. तरीही त्याला राहुलची विकेट घेण्यात यश आले नाही. हे पाहून अचंबित झालेल्या बुमराहने सामना संपल्यानंतर राहुलकडे धाव घेतली आणि त्याच्या बॅटचे बारीक निरिक्षण केले. राहुलच्या हातून आपल्या हाती बॅट घेत जणू तो तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग वैगेरे तर लावलेले नाही ना, असे विचारत असल्यासारखे भासत आहे. अनेकांनी यावेळचा फोटो शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/Sachin1746/status/1385653608704724996?s=20

https://twitter.com/Legacy_Daark/status/1385793192033865731?s=20

एवढेच नव्हे तर, बुमराहने यानंतर पंजाबचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन अनिल कुंबळे आणि गोलंदाज मोहम्मद शमीचीही भेट घेतली. कुंबळे शमीला काही गोष्टींबाबत ज्ञान देत असताना बुमराहही तिथे पोहोचला आणि त्यांच्या संवादात सामील झाला.

आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या बुमराहला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. ३ षटके गोलंदाजी करताना त्याने २१ धावा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---