---Advertisement---

“खुद्द त्याची आई त्याच्या क्रिकेटपटू बनण्यावर शंका घ्यायची,” बुमराहच्या प्रशिक्षकाने दिला जुन्या आठवणींना उजाळा

On: रविवार, फेब्रुवारी 28, 2021 9:29 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणले जाते. आपल्या अनोख्या आणि अप्रतिम गोलंदाजी शैलीमुळे बुमराहची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु कधीकाळी याच शैलीमुळे बुमराहची थट्टा केली जात असायची. एवढेच नव्हे तर, त्याच्या क्रिकेटपटू बनण्यावरही शंका घेतली जात असायची. बुमराहचे लहानपणीचे क्रिकेट प्रशिक्षक किशोर त्रिवेदी यांनी याबाबत खुलासा केला आहे.

त्रिवेदी त्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की, “एकदा बुमराहच्या त्याच्या शाळेतील क्रिकेट अकादमीत त्याच्या क्विक आर्म ऍक्शन आणि शॉर्ट रनअपने फलंदाजांना सतवत होता. त्यावेळी काही वेगवान गोलंदाजीचा सराव करणारी मुले माझ्याकडे आली. त्यांनी मला सांगितले की, बुमराह नुसता चेंडू फेकत आहे. त्याची गोलंदाजी ऍक्शन (शैली) चांगली नाही. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर मीही थक्क झालो होतो की छोट्या रनअपनेही बुमराहच्या चेंडूला कसा इतका वेग मिळत होता.”

“मग मी मुलांना म्हणालो की, बुमराहची शैली असाधारण आहे. त्याचा पुढचा हात खूप उंचावर जातो, याचमुळे त्याची शैली इतरांपेक्षा वेगळी आहे. परंतु त्याला त्याच्या शैलीत थोडीफार सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मी त्याला म्हटले होते जर तू गांभीर्याने गोलंदाजी केलीस तर मी तुला आरसीए संघाकडून मोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळायला पाठवेन. पुढे त्याने झपाट्याने प्रगती करायला सुरुवात केली. यादरम्यान मला जाणीव झाली त्याची गोलंदाजी शैलीच त्याचे हत्यार आहे. म्हणून मी त्याला गोलंदाजी शैलीत बदल न करण्याचा सल्ला दिला,” असे पुढे त्रिवेदी म्हणाले.

“परंतु त्यावेळी बुमराहला वयोगटातील आणि १६ वर्षांखालील क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्याची आई तो क्रिकेटपटू बनण्यावर शंका घेऊ लागली. एवढेच नव्हे तर, त्याला गुजरात संघाकडून १९ वर्षांखालील क्रिकेटसाठी ट्रायल द्यायला गेल्यानंतर टीकांचा सामना करावा लागला होता. अनेकांनी त्याच्या गोलंदाजी शैलीवर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु गुजरातचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक हितेश मजूमदार यांनी त्याच्यातील प्रतिभेला आणि त्यांनी बुमराहला देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये संधी दिली,” असे शेवटी बोलताना त्रिवेदींनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

कुंबळेंना पछाडत मानाच्या विक्रमात अव्वल बनण्याची संधी; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”

पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी आहे ‘ही’ बॅड न्यूज! प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहाता येणार नाहीत वनडे सामने

एवढी प्रेमळ पत्नी असताना कोण कसं डिप्रेशनमध्ये जाईल; विराटच्या ‘त्या’ भाष्यावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---