भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील जवळपास दहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन सातत्याने लांबत होते. मात्र, आता त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा संपली असून, भारतीय संघाच्या आगामी आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघाचा भाग असू शकतो.
बुमराह मागील वर्षी आयपीएल नंतर दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या आशिया चषकात तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याला पुनरागमनाची संधी दिली गेली. मात्र, दुसऱ्याच सामन्यात त्याची दुखापत पुन्हा एकदा चिघळल्याने तो मैदानावर गेला. यानंतर तो अद्याप मैदानावर परतलेला नाही. मे महिन्यात त्याच्यावर सर्जरी झाली असून त्यातून तो सावरत आहे.
बुमराह सध्या बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमातून जातोय. मिळत असलेल्या माहितीनुसार, बुमराह वेगाने तंदुरुस्ती प्राप्त करत असून, त्याच्या गोलंदाजीला देखील पहिल्यासारखा वेग आल्याचे दिसते. तो दिवसाला दहा षटके आपल्या नेहमीच्या वेगाने गोलंदाजी करतो.
याच कारणामुळे पुढील महिन्यात होत असलेल्या आयर्लंड दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत तो भारतीय संघाचा भाग असू शकतो. त्यानंतर आशिया चषकात देखील तो खेळणे निश्चित आहे. बुमराह व्यतिरिक्त फलंदाज श्रेयस अय्यर हा देखील तंदुरुस्ती मिळवण्याच्या अगदी जवळ असून, तो देखील याच दौऱ्यावर भारतीय संघाचा पुन्हा एकदा भाग बनू शकतो. (Jasprit Bumrah Comeback In Team India Likey On Ireland Tour)
महत्वाच्या बातम्या –
BANvsIND Womens । टी-20 मालिकेची डोकेदुखी वनडेत नको! हरमनप्रीत कौरला चांगल्या खेळपट्टीची अपेक्षा
वर्ल्डकपमधून अर्शदीपचा पत्ता कट? बीसीसीआयच्या ‘या’ निर्णयाने उपस्थित झाला प्रश्न