---Advertisement---

निवृत्तीच्या सामन्यात ‘सुरंगा लकमल’ची बुमराहने केली दांडी गुल; पण नंतर केलेल्या कृतीने लाखो फॅन्सचे ‘दिलखूश’

On: सोमवार, मार्च 14, 2022 7:13 PM
Jasprit-Bumrah-And-Suranga-Lakmal
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला. मात्र, असे असले तरीही हा सामना सुरंगा लकमलसाठी महत्त्वाचा सामना होता. कारण, हा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. या सामन्यात भारताविरुद्ध बचावात्मक खेळी करत लकमल झुंज देत होता. मात्र, झुंज देण्याच्या प्रयत्नात तो जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. यावेळी बुमराह शेवटच्या सामन्यातून तंबूत परतत असलेल्या लकमलला निवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी धावला आणि त्याची गळाभेटही घेतली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

झाले असे की, दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून ५९ व्या षटकात सुरंगा लकमल (Suranga Lakmal) फलंदाजी करत होता. हे षटक बूम बूम बुमराह (Jasprit Bumrah) टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर बुमराहने लकमलची दांडी गुल केली. मात्र, जेव्हा लकमल बाद झाल्यानंतर मैदानावरून पव्हेलियनमध्ये जात होता, तेव्हाच बुमराह त्याच्या जवळ आला आणि त्याची गळाभेट घेतली. तसेच, त्याने त्याच्या आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छाही दिल्या. विशेष म्हणजे, फक्त बुमराहच नाही, तर संघातील इतर खेळाडूंनीही लकमलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आता सोशल मीडियावर यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

जसप्रीत बुमराहचे सुंदर कृतीसाठी सोशल मीडियावर कौतुक
बुमराहच्या या सुंदर कृतीसाठी त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने ट्वीट करत म्हटले आहे की, “विकेट घेतल्यानंतर बुमराहकडून सुंदर कृती. बुमराहने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या लकमलची गळाभेट घेतली.”

https://twitter.com/CRICKET04756762/status/1503343823853801483

इतर युजर्सच्या प्रतिक्रिया-

https://twitter.com/BCCI/status/1503361760069566464?s=20&t=uTFJYHzs8tVZh0LY5q1nRA

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1503343607666798592

https://twitter.com/ayan_acharya13/status/1503343003850592256

https://twitter.com/Gunnersyd/status/1503343477618524161

https://twitter.com/addicric/status/1503349115857514498?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1503349115857514498%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fsri-lanka-tour-of-india-2022%2Fwatch-indian-players-come-up-with-special-gesture-after-suranga-lakmals-last-innings%2F

सुरंगा लकमलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-
सुरंगा लकमलच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ७० कसोटी सामने, ८६ वनडे सामने आणि ११ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ३ च्या इकॉनॉमीने १७१ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने ५.४६ च्या इकॉनॉमी रेटने १०९ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील विकेट्सबद्दल बोलायचं झालं, तर ८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आर अश्विनचा डेल स्टेनला ‘४४०’चा झटका, अद्वितीय कारकिर्दीत जोडली आणखी एक सोनेरी किनार

माजी क्रिकेटरने नेतृत्त्वात रोहितची धोनीशी केली तुलना, २०११ विश्वचषकाला म्हटले ‘टर्निंग पाँईट’

महान भारतीय कर्णधारही बळींचा पंचक घेणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीच्या प्रेमात; म्हणाले, ‘एवढी प्रतिभा…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---