वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. भारताने विराट कोहली, शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर 357 पर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेला जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर दणका दिला.
https://www.instagram.com/reel/CzJSh4tszDi/?igshid=MzRlODBiNWFlZA==
विजयासाठी मिळालेला मोठ्या धावांचा पाठलाग करताना बुमराह याने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा फॉर्ममधील सलामीवीर पथुम निसंका याला पायचित केले. त्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली असता त्यांनी मैदानावरील पंचांचा निर्णय अंतिम ठेवण्यात आला.
त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाजाला आलेल्या मोहम्मद सिराज याने देखील आपल्या पहिल्या चेंडूवर बळी मिळवला. त्याने दुसरा सलामीवीर दिमुथ करूणारत्ने याला पायचित केले. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने सदिरा समरविक्रमा याला श्रेयस अय्यरच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. तसेच आपल्या पुढच्या षटकात त्याने श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस त्याला देखील तंबूचा रस्ता दाखवला.
(Jasprit Bumrah Dents Srilanka On First Ball )
हेही वाचा-
आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI