विश्वचषक 2023 स्पर्धेतील 33व्या सामन्याचे आयोजन वानखेडे स्टेडिअम येथे होणार आहे. गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) या सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक श्रीलंका संघाचा कर्णधार कुसल मेंडिस याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात श्रीलंका संघाने फक्त एक बदल केला आहे. धनंजय डी सिल्वा बाहेर पडला असून त्याच्या जागी दुष्मंथ चमीरा याची संघात एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, भारतीय संघात कोणताही बदल झाला नाहीये.
🚨 Toss and Team Update 🚨
Sri Lanka win the toss and elect to bowl first.
A look at #TeamIndia's Playing XI 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/rKxnidWn0v#CWC23 | #MenInBlue | #INDvSL pic.twitter.com/aI5l9xm4p4
— BCCI (@BCCI) November 2, 2023
स्पर्धेत भारत आघाडीवर
भारतीय संघाने (Team India) विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या सहाही सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारत 12 गुण मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. भारताने या सहा सामन्यांपैकी 5 सामने हे आव्हानाचा पाठलाग करताना जिंकले आहेत. तसेच, एक सामना धावांचा बचाव करताना जिंकला आहे.
दुसरीकडे, श्रीलंका (Sri Lanka) संघाविषयी बोलायचं झालं, तर त्यांनीही आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. मात्र, त्यांच्या पदरी फक्त 2 विजय पडले आहेत. तसेच, 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे 2 विजयांनंतर त्यांचे 4 गुण असून पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंका सातव्या स्थानी आहे. अशात या सामन्यात श्रीलंका संघ भारताला पराभूत करत तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तसेच, भारतीय संघ या सामन्यात श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत विश्वचषकातील सलग सातवा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने हा सामना जिंकला, तर भारत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल. (Sri Lanka have won the toss and have opted to field against india)
विश्वचषकाच्या 33व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
श्रीलंका
पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथ चमीरा, दिलशान मदुशंका
हेही वाचा-
CWC 23: पंड्याच्या पुनरागमनाविषयी रोहितने दिली मोठी माहिती, म्हणाला, ‘आम्हाला दरदिवशी…’
श्रीलंकेविरुद्ध भिडण्यापूर्वी रोहितची गर्जना; म्हणाला, ‘कोणताही विचार न करता बॅट…’