आयपीएल 2024 दरम्यान मुंबई इंडियन्समध्ये बऱ्याच हलचाली पाहायला मिळाले. मुंबई संघ व्यवस्थानपनाने पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या कर्णधार रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघात स्थान दिले होते. मुंबईने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करुन संघात सामील केले होते. हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. संपूर्ण हंगामात चाहत्यांनी हार्दिकवर जोरदार टीका केली होती. आता जसप्रीत बुमराहने या वादावर बोलला आहे.
बुमराहने सांगितले की, संघातील प्रत्येकजण एकमेकांना सपोर्ट करत होता. हार्दिक पांड्यालाही संघाकडून पूर्ण पाठिंबा मिळत होता. संघातील उपस्थित प्रत्येकजण नव्या कर्णधाराशी छानच बोलत होता. बुमराहने असेही म्हटले की, काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत.
‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना बुमराह म्हणाला, “आम्ही एक संघ म्हणून कोणत्याही व्यक्तीला मागे सोडू शकत नाही. आम्ही एकमेकांसाठी आहोत. आम्ही एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी हार्दिकसोबत खूप क्रिकेट खेळलो आहे पण तो तरुण आहे. खेळाडू आणि आम्हाला त्याची फारशी ओळख करून द्यायची गरज नाही, तुम्हा सर्वांना ते माहीती आहे.”
बुमराह पुढे म्हणाला, “पण त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आम्ही एक संघ म्हणून येथे त्या गोष्टी करत नाही. पण आम्ही एक संघ म्हणून त्याच्यासोबत होतो. आम्ही त्याच्याशी बोलत होतो. “काही गोष्टी नियंत्रणाबाहेर असतात, आम्ही विश्वचषक जिंकल्यानंतर कथा बदलली.”
भारतीय संघाने जूनमध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या 2024 टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने भारताला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यानंतर हार्दिकबद्दलच्या चाहत्यांच्या विचारात बदल झाला होता. टी20 विश्वचषकानंतर हार्दिककडे हिरो म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
हेही वाचा-
‘आम्ही चांगले लोक आहोत…’, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी पाकिस्तान क्रिकेटपटूचे अनोखे विधान
श्रीलंकेमालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा फटका, सरावादरम्यान स्टार खेळाडू दुखापत
राहुल द्रविडचा मुलगा समितची उत्कृष्ट कामगिरी, महाराजा ट्रॉफीसाठी या संघाचा बनला भाग