भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाहुणा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरला. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद 233 धावा केल्या आहेत.
बांगलादेशसाठी मोमिनुल हकनं शानदार फलंदाजी करत शतक झळकावलं. हे त्याचं भारतीय खेळपट्ट्यांवरील पहिलं कसोटी शतक आहे. टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शानदार कामगिरी केली. बुमराह यावर्षी तुफान फार्मात आहे. त्यानं खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या गोलंदाजीनं कहर केला आहे.
पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं एकूण 3 बळी घेतले. यासह त्यानं 2024 मध्ये 50 आंतरराष्ट्रीय बळींचा टप्पा गाठला. यावर्षी आतापर्यंत अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील पहिला गोलंदाज आहे. बुमराहनं या सामन्यात मुशफिकूर रहीम, मेहंदी हसन मिराज आणि तजिमुल इस्लाम यांची विकेट घेतली. बुमराहनं एकूण 18 षटकं गोलंदाजी केली, ज्यात त्यानं 7 षटकं मेडन टाकले. त्यानं आपल्या स्पेल मध्ये 50 धावा खर्च केल्या.
2024 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारे गोलंदाज
जसप्रीत बुमराह – 50 (15 सामने)
एहसान खान – 46 (27 सामने)
जोश हेजलवूड – 44 (21 सामने)
वानिंदू हसरंगा – 43 (20 सामने)
ॲडम झंपा – 31 (25 सामने)
जसप्रीत बुमराहनं या सामन्यात आणखी एक विक्रम केला. तो इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सर्वाधिक बळी घेणारा सहावा गोलंदाज बनला. बुमराहच्या आता डब्ल्यूटीसीच्या 28 कसोटी सामन्यांमध्ये 118 विकेट्स आहेत. ऑस्ट्रेलियाचा नॅथन लॉयन 187 विकेट्ससह या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर आर अश्विन 182 विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा –
बांगलादेशच्या फलंदाजाची शतक ठोकूनही फजिती! नकोश्या लिस्टमध्ये मिळवलं स्थान
अद्भूत, अविश्वसनीय!! मोहम्मद सिराजचा मागे डाइव्ह मारत खतरनाक झेल; VIDEO एकदा पाहाच
रोहित नाही ‘सुपरमॅन’ म्हणा! एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसेना! VIDEO