इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारताचा प्रभारी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावावर राहिला. बुमराहने आक्रमक फलंदाजी खेळीनंतर गोलंदाजीतही दमदार प्रदर्शन केले. यावेळी नशीबही त्याच्या बाजूने राहिल्याचे दिसले. बुमराहने ११ षटके गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या. यापैकी २ विकेट्स त्याला नो बॉलमुळे मिळाल्या.
नो बॉलमुळे मिळाल्या विकेट्स
बुमराहने (Jasprit Bumrah) दुसऱ्या दिवशी ११ षटकांमध्ये ३ विकेट्स चटकावल्या. यातील २ विकेट्स त्याला नो बॉलच्या मदतीने मिळाल्या. सर्वप्रथम त्याने इंग्लंडचा सलामीवीर ऍलेक्स लीस याला बाद केले. इंग्लंडच्या डावातील तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने ही विकेट घेतली. खरे तर, बुमराहला ही विकेट घेण्याची संधी मिळाली नसती. परंतु त्याने षटकातील अखेरचा चेंडू नो बॉल (No Ball) टाकला, ज्यामुळे त्याला पुन्हा हा चेंडू फेकावा लागला. याच चेंडूवर बुमराहने लीसची विकेट घेतली. त्याचा हा चेंडू लीसच्या बॅट आणि पॅडच्या मधून निघून गेला आणि सरळ यष्टीला जाऊन लागला.
तसेच ओली पोपलाही बुमराहने अशाच प्रकारे बाद केले. त्याने इंग्लंडच्या डावातील ११व्या षटकातील सहाव्या चेंडूवर पोपला श्रेयस अय्यरच्या हातून झेलबाद केले. सुरुवातीला त्याने हा चेंडू नो बॉल टाकला होता, ज्यामुळे त्याला पुन्हा चेंडू फेकावा लागला. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू फेकला, ज्याला पोपने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटला कडेला लागून स्लिपमध्ये अय्यरच्या हाती गेला.
#Bumrah is completely owning Day 2 and how! 🙌🏽
3rd Wicket for BOOM BOOM as he gets #OlliePope caught out 🔥
Tune in to Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN) & Sony Ten 4 (TAM/TEL) – (https://t.co/tsfQJW6cGi)#ENGvINDLIVEonSonySportsNetwork #ENGvIND pic.twitter.com/cUYTGvvSts
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 2, 2022
अशाप्रकारे बुमराहने पहिल्यांदा नो बॉल टाकल्यानंतर पुढील चेंडूवर विकेट्स घेतल्यानंतर अनेकांना विश्वास होत नव्हता.
बुमराहने घेतल्या ३ विकेट्स
दरम्यान बुमराहने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने ऍलेक्स लीस, ओली पोप यांच्याबरोबरच झॅक क्राउले यालाही बाद केले. लीसला त्याने ६ धावांवर त्रिफळाचीत केले. तर पोपला १० धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. याखेरीज क्राउलेला त्याने ९ धावांवर झेलबाद केले. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवसाखेर २७ षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर ८४ धावा करू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या रोहित कधी होतोय टीम इंडियात सामील
‘प्रिय बीसीसीआय, बुमराहला कसोटीचा नियमित कर्णधार बनवा’; चाहत्यांकडून होतेय जोरदार मागणी
मराठीत माहिती- क्रिकेटर हरभजन सिंग