भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह सध्या विश्रांतीवर आहे. बांगलादेशच्या भारत दौऱ्यापूर्वी टीम इंडियातून विश्रांती मिळाल्यानंतर बुमराह आपल्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. दरम्यान माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याच्या शहरात अर्थातच चेन्नईत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नुकताच जसप्रीत बुमराह चेन्नईला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता, जिथे त्याच्या चाहत्यांनी त्याचे भव्य स्वागत केले. भारतीय क्रिकेटपटूंचे देशभरात करोडो चाहते आहेत आणि ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. जसप्रीत बुमराहचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून याचा अंदाज येऊ शकतो. धोनीवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चेन्नईने बुमराहलाही भरभरून प्रेम दिले आहे. जसप्रीत बुमराहचे महाराजाप्रमाणे मनापासून स्वागत करण्यात आले, त्याला मुकुट आणि फुलांचा हार घालण्यात आला. चेन्नईकरांचे हृदय फक्त थालासाठी धडधडत असले तरीही तेथील चाहत्यांनी बुमराहचे स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
चाहत्यांनी राजासारखे स्वागत केले
सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने जसप्रीत बुमराहला फ्रेशर्स डे सेलिब्रेशनसाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जसप्रीत बुमराह चेन्नईला गेला होता. यावेळी त्याचे तेथे भव्य स्वागत करण्यात आले, ज्याचा व्हिडिओ जसप्रीत बुमराहने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, गर्दीची ऊर्जा आणि उत्साह यामुळे कार्यक्रम खरोखरच अविस्मरणीय झाला.
कार्यक्रमादरम्यान बुमराहचे गळ्यात सुंदर फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. तो महाराजासारखा आत शिरला. बुमराह स्टेजवर पोहोचताच त्याच्या डोक्यावर मुकुट घालण्यात आला. यावेळी हजारो चाहते बुमराहची एक झलक पाहण्यासाठी आले होते.
View this post on Instagram
दरम्यान जसप्रीत बुमराह शेवटचा टी20 विश्वचषक अंतिम सामन्यात खेळताना दिसला होता. तेव्हापासून तो क्रिकेटमधून विश्रांतीवर आहे. तो लवकरच टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. रिपोर्टनुसार, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बुमराह पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. तो दोनपैकी एका कसोटी सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार रोहितने कसली कंबर, सुरू केली खास ट्रेनिंग
राहुल द्रविडच्या मुलाचा फ्लॉप शो जारी, बंगळुरूविरुद्ध संघाचा एकतर्फी पराभव
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?