यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं दमदार कामगिरी केली आहे. भारताचा विजयी रथ चालूच आहे. साखळी सामन्यात भारतानं विजयाची हॅट्रिक लगावली. तर सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तान संघाचा धुव्वा उडवला. भारताच्या विजयात संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) महत्वाची भूमिक बजावली आहे. बुमराहनं विरोधी संघांच्या फलंदाजांना विश्वचषकात डोकचं वर काढू दिलं नाही.
या टी20 वर्ल्डकपमध्ये बुमराहनं आश्चर्यकारक गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत बुमराहनं 15 षटकं टाकली आहेत, त्यामध्ये विरोधी संघाचं फलंदाज त्याला केवळ 3 चौकार आणि 1 षटकार मारू शकले आहेत. तसंच जसप्रीत बुमराहनं विरोधी संघातील 8 फलंदाजांना त्याचा शिकार बनवलं आहे. बुमराह ज्याप्रकारे महत्त्वाच्या प्रसंगी भारतासाठी विकेट्स घेत आहे आणि धावा रोखण्याचं काम करत आहे, त्यावरुन तो या स्पर्धेत भारतासाठी मौल्यवान खेळाडू ठरत आहे.
टी20 विश्वचषकाच्या या स्पर्धेत बुमराहनं आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 15 षटकं टाकली आहेत. त्यामध्ये त्यानं 6.50 च्या सरासरीनं 8 विकेट्स घेतले आहेत. यंदाच्या टी20 विश्वचषकात बुमराहनं सर्वाधिक कमी इकाॅनाॅमी रेटनं धावा दिल्या आहेत. आज (22 जून) भारतीय संघ सुपर 8 फेरीचा दुसरा सामना बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला बांग्लादेशचं आव्हान असणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया (24 जून) रोजी आमनेसामने असणार आहेत.
परंतु आजच्या सामन्यात भारतानं बांग्लादेशला पराभूत केलं तर त्यांना यंदाच्या टी20 विश्वचषकातल्या सेमीफायनलसाठी मार्ग सोपा होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया ग्रुप-अ च्या गुणतालिकेत शीर्ष स्थानी आहे. तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचं समान 2-2 गुण आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला आहे. आज जर भारतीय संघ बांग्लादेशला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर तो गुणतालिकेत मुसंडी मारेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूचे बांग्लादेशविरुद्ध आकडे शानदार, रोहित शर्मा संघात संधी देणार का?
भारत-बांगलादेश सामन्यात हे 3 मोठे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात, अर्शदीप सिंगकडे इतिहास रचण्याची संधी
वर्ल्डकपच्या झगमगाटापासून दूर, माही मित्रांसोबत लुटतोय सुट्यांचा आनंद! पाहा व्हिडिओ