भारतीय संघ 2021च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. या वर्षी देखील भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळू शकतो. यामध्ये भारताच्या गोलंदाजांचे महत्वाचे योगदान आहे. भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणाला विकेट मिळवून देण्यात आणि धावगतीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवले. आज आपण अशा भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी 2022मध्ये कसोटी प्रकारात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या.
5. शार्दुल ठाकूर
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने 2022 यावर्षात एकूण 3 कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्याच्या 6 डावांमध्ये त्याने 11 विकेट घेतल्या. यात त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध केले होते. त्याने 61 धावा देत 7 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या नावावर एका 5 विकेट हॉलची देखील नोंद आहे.
4. अक्षर पटेल
अक्षर पटेल (Axar Patel) याने 2022मध्ये 3 कसोटी सामने खेळले. यात त्याने एकूण 11 विकेट घेतल्या . यात त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनात त्याने 77 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. 2022 या वर्षात त्याच्या नावावर 5 विकेट हॉलची नोंद नाहीये.
3.मोहम्मद शमी
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने या वर्षात एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने खेळलेल्या 10 डावात एकूण 13 विकेट घेतल्या. या वर्षात तो बराच काळ दुखापतग्रस्त असल्याने त्याला जास्त सामने खेळता आले नाही.
2. रवीचंद्रन अश्विन
भारतासाठी 2022 या वर्षात कसोटी प्रकारात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन (R. Ashwin) दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने यावर्षी एकूण 6 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 20 विकेट घेतल्या. या वर्षात त्याने 47 धावा देत 4 विकेट घेणे हा त्याचे वैयक्तिक चांगले प्रदर्शन होतेे.
1. जसप्रित बुमराह
2022 या वर्षात भारतासाठी कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) याने घेतल्या आहे. त्याने यावर्षी एकूण 5 सामने खेळले. ज्यात त्याने सर्वाधिक 22 विकेट घेतल्या. 24 धावा देत 5 विकेट हे त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होते. मात्र, तो बऱ्याच काळापासून दुखापतग्रस्त आहे. त्याच्या संघात नसल्याची उणीव भारतीय संघाला चांगलीच भासली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटसाठी वेडं झालयं जग, गुगल सर्चच्या बाबतीत फीफा विश्वचषकालाही टाकले मागे
गुड बाय 2022 | क्रिकेटच्या मैदानात यावर्षी सर्वाधिक गाजलेले 6 वाद, यादीत दग्गजांचा समावेश