सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून(७ जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात केवळ २ विकेट्स गमावत १६६ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाखेर मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथ नाबाद खेळत होते. तसेच या दोघांमध्ये ६० धावांची भागीदारीही झाली होती. यादरम्यान चाहत्यांना एक गमतीशीर गोष्ट बुमराहकडून पाहायला मिळाली.
भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने गोलंदाजीदरम्यान फलंदाजी करणाऱ्या स्मिथची मजेशीर नक्कल केली. ज्याप्रमाणे स्मिथ शॉट खेळल्यानंतर कृती करतो, त्या कृतीची बुमराहने नक्कल केली. बुमराहला स्मिथची अशी नक्कल करताना पाहून त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजलाही हसू आवरता आले नाही. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/JBFC93/status/1347072290123440129
https://twitter.com/nytri_x/status/1347143157973061638
या सामन्यात पहिल्या दिवशी बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ५५ षटकांचाच खेळ झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अर्धातास लवकर खेळ सुरु झाला. दुसऱ्या दिवशी स्मिथने लॅब्यूशानेसह १०० धावांची भागीदारी केली. लॅब्यूशाने ९१ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ मॅथ्यू वेड आणि कॅमेरॉन ग्रीनही स्वस्तात बाद झाले.
ग्रीनला शुन्यावर बुमराहने पायचीत केले. तर लॅब्यूशाने आणि वेडला रविंद्र जडेजाने बाद केले. असे असले तरी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत स्मिथ नाबाद खेळत आहे. त्याने नाबाद ७६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणांमुळे सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने गाजवले वर्चस्व
आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तानची वनडे मालिका पुढे ढकलली, ‘हे’ आहे कारण