भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सेंचुरियन येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे (Centurion Test). सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ३२७ धावांवर बाद झाला. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात आपले चार बळी अवघ्या ३० धावांमध्ये गमावले. मात्र, याच वेळी भारतीय संघासाठी देखील एक वाईट बातमी समोर आली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला आहे. (Jasprit Bumrah Injured)
बुमराह झाला दुखापतग्रस्त
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २९ वे षटक टाकत असताना जसप्रीत बुमराह याचा पाय मुरगळला. यानंतर तो असह्य वेदनेत दिसून आला. संघाच्या वैद्यकीय पथकाने त्याला तात्काळ ड्रेसिंग रूम मध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या पायाला भरपूर पट्ट्या करण्यात आल्याचे दिसत आहे. तो कधीपर्यंत तंदुरुस्त होईल, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. तरीही, तो काही वेळाने मैदानाबाहेर उभा असलेला दिसला. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली. (BCCI)
Update: Jasprit Bumrah has suffered a right ankle sprain while bowling in the first innings.
The medical team is monitoring him at the moment.
Shreyas Iyer is on the field as his substitute.#SAvIND
— BCCI (@BCCI) December 28, 2021
बुमराहने मिळवून दिला पहिला बळी
भारतीय संघ सर्वबाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराह यानेच भारताला पहिले यश मिळवून दिले होते. पहिल्याच षटकात त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. बुमराहने आत्तापर्यंत ५.५ षटके गोलंदाजी करताना १२ धावा देत १ बळी मिळविला आहे. भारतीय संघाला या मालिकेत चांगली कामगिरी करायची असल्यास त्याचे पूर्णपणे तंदुरुस्त राहणे गरजेचे असेल. (India Tour Of South Africa)
महत्त्वाच्या बातम्या
२०२१ गाजवणारे टॉप टी२० फलंदाज; भारतीयांनी केली सपशेल निराशा (mahasports.in)