---Advertisement---

ओय होय! वाढदिवशी पती जसप्रीत बुमराहला किस करताना दिसली संजना; गोलंदाजाने भन्नाट कॅप्शन देत शेअर केला फोटो

On: गुरूवार, मे 6, 2021 6:47 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएलच्या कमिटीने बैठक घेऊन आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. परंतु तो प्रेमाच्या खेळपट्टीवर सुपरहिट ठरताना दिसून येत आहे. त्याने आपल्या पत्नीला हटके स्टाइलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही आज (६ मे ) आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेकांनी तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच जसप्रीत बुमराहने देखील सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये संजना गणेशन त्याला किस करताना दिसून येत आहे. तसेच या फोटोला त्याने हटके कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले की, “त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, जी रोज माझे हृदय चोरते. आय लव्ह यू.” या फोटोला आतापर्यंत लाखांच्यावर अधिक लोकांनी लाईक केले आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेला अखेर पूर्णविराम लावण्यात आला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्यासाठी जोरदार मागणी केली जात होती. इतक्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मंगळवारी (४ मे ) वृद्धीमान सहाला आणि अमित मिश्राला कोरोनाची लागण झाल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हा निर्णय घेतल्यानंतर राजीव शुक्ला म्हणाले होते की, “आम्ही यावर नक्कीच विचार करू की, या वर्षी पुढे चालून आम्हाला आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यासाठी योग्य वेळ मिळतो का? हे सप्टेंबरमध्ये होऊ शकते, परंतु सध्या ही केवळ शक्यता असेल. आताची परिस्थिती पाहता आम्ही आयपीएल स्पर्धेचे आयोजन करत नाही आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या –

दु:खद! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचे झाले कोरोनाने निधन; दोन आठवड्यांपूर्वीच गमावले होते आईला

“भारत हा एक विशेष देश आहे, जो यावेळी…”, जॉस बटलरचा आयपीएल सोडताना भावूक संदेश

मॅन ऑन मिशन! आयपीएल स्थगित झाल्यानंतर विराटने कोरोनाच्या काळात ‘हे’ महत्वाचे कार्य घेतले हाती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---