भारतीय संघाचा सध्याचा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील यष्टीरक्षक केएल राहुलने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करणे महाकठीण असल्याचे सांगितले आहे.
केएल राहुल भारताकडून पुर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून १० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण केले आहे.
ट्विटरवरील प्रश्नउत्तरांच्या सेशनमध्ये त्याने एका चाहत्याच्या प्रश्नावर हे उत्तर दिले. तु यष्टीरक्षणाचा आनंद घेतोस का? कुणाची गोलंदाजी यष्टीरक्षणासाठी कठीण आहे?, असा प्रश्न चाहत्याने विचारला होता.
Absolutely enjoying wicketkeeping. The toughest bowler to keep to is @Jaspritbumrah93 https://t.co/j9YGnWZ7ST
— K L Rahul (@klrahul) May 10, 2020
यावर केएल राहुलने बुमराहचे नाव घेतले होते. “मी यष्टीरक्षणाचा मनापासून आनंद घेत आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करणे कठीण आहे,” असे राहुलने त्या चाहत्याला उत्तर दिले.
केएल राहुल भारताकडून ३६ कसोटी, ३२ वनडे व ४२ टी२० सामने खेळला आहे.