भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. वैयक्तिक कारणांसाठी माघार घेत असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी बुमराहने लग्न करत असल्याकारणाने ही माघार घेतली असल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र त्यांनतर बुमराह कधी लग्न करणार, त्याची होणारी पत्नी कोण?, अशा अनेक प्रश्नांबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण आता या सगळ्या प्रश्नांचाही उलगडा होत असल्याची चिन्हे आहेत. बुमराह आणि त्याच्या कुटुंबियांकडून अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी सोशल मिडीयावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
अभिनेत्रीचे नाव आहे चर्चेत
सोशल मिडीयावर सध्या जसप्रीत बुमराहची नियोजित वधू दक्षिण भारतीय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन असल्याची अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी देखील बुमराह आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या अफेअरबद्दल चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोघांनीही या गोष्टीला कधीच दुजोरा दिला नाही. मात्र अनुपमा परमेश्वरनने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर आपण सुट्टीवर जात असल्याची पोस्ट टाकली होती. त्यामुळे या चर्चेने जोर धरला आहे.
गोव्यात लग्नसोहळा होण्याची शक्यता
दरम्यान, बुमराह गोव्यात लग्न करण्याची देखील चर्चा आता सुरु झाली आहे. मार्च महिन्याच्या मध्यात हा लग्नसोहळा आयोजिला जाण्याची शक्यता आहे. तसेच गोव्यातील या लग्नसोहळ्यात मर्यादित अतिथींना निमंत्रण दिले जाण्याची देखील शक्यता आहे. मात्र बुमराह किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणीही यापैकी कुठल्याच वृत्ताला दुजोरा दिला नाहिये.
मात्र जर हे वृत्त खरे असले तर जसप्रीत बुमराह आपली सुट्टी वाढवू शकतो. चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्यानंतर तो पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतून देखील विश्रांती घेण्याची परवानगी बीसीसीला मागू शकतो. त्यामुळे आता चाहत्यांचे या घडामोडींकडे बारीक लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
कौतुकास्पद! षटकाराने तुटलेल्या खुर्चीवर मॅक्सवेलने केली सही, समाज कार्यासाठी होणार दान
मैदानात उतरताच विराटची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; रुटच्याही नावावर खास विक्रमाची नोंद






