बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये एका प्रश्नानं घर केलं आहे. हा प्रश्न म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला का? रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे. मात्र संघाचा उपकर्णधार कोण असेल, हे निवडकर्त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. याचाच अर्थ बुमराहचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. कारण यापूर्वी तो भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता.
आता या निर्णयामागचं कारण काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. संघात निवड होऊनही बुमराहवर असा अन्याय का झाला? जर एखादा खेळाडू आधीच एखाद्या पदावर असेल आणि त्याचा संघात समावेश असेल, तरीही त्याला ते पद पुन्हा मिळत नाही, म्हणजेच भविष्यातही या पदासाठी त्याचा विचार होणार नाही. बुमराहला आता पुन्हा उपकर्णधारपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी हा निर्णय का घेतला? असे प्रश्न चाहते विचारू लागले आहेत.
टी20 विश्वचषकानंतर बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “विराट कोहली आणि रोहित शर्मा व्यतिरिक्त, बुमराह हा एकमेव खेळाडू आहे, ज्याचं वर्कलोड मॅनेज करण्यात येत आहे. कदाचित यामुळेच त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली नसावी. बुमराहची फिटनेस पाहता, तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे सर्व सामने खेळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे त्याला हा अतिरिक्त भार देण्यात आला नसावा, असं बोललं जात आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. या सर्व महत्त्वाच्या मालिकांमध्ये बुमराहचं फिट असणं, भारतीय संघासाठी गरजेचं आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
हेही वाचा –
केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवूनही भारतीय संघात स्थान नाही! श्रेयस अय्यरला वगळण्यामागचं कारण काय?
गौतम गंभीरनंतर कोण बनणार केकेआरचा मेंटॉर? 2 आयपीएल जिंकणाऱ्या दिग्गजाचं नाव आघाडीवर
ऋतुराज-अय्यरला वगळलं, पण या तिघांना संधी कशी मिळाली? संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित