गुरुवारी (18 एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं अखेरच्या षटकामध्ये विजय मिळवला. या सामन्यात मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शानदार गोलंदाजी केली. बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 21 रन देऊन पंजाबचे 3 गडी बाद केले. त्यानं रिली रूसो, कर्णधार सॅम करन आणि धोकादायक शशांक सिंहला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स 9 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी झाली. आता मुंबईचे 7 सामन्यांमध्ये 3 विजयासह 6 गुण असून ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत.
आकडे सांगतात की, जसप्रीत बुमराह या हंगामामध्ये विरोधी फलंदाजांसाठी डोकेदुखी बनला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध बुमराहनं 4 ओव्हरमध्ये केवळ 13 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. यानंतर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या हाय स्कोअरिंग सामन्यात त्यानं 4 षटकांमध्ये 36 धावाच दिल्या होत्या. तर राजस्थान रॉयल्वविरुद्ध बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 26 रन दिले होते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात तर त्यानं कमालच केली. आरसीबीविरुद्ध बुमराहनं पाच बळी घेतले होते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 5 फलंदाजांना आपलं शिकार बनवलं. यामध्ये विराट कोहलीच्या मोठ्या विकेटसाही समावेश होता. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध बुमराहनं 4 षटकांत केवळ 27 धावा दिल्या होत्या. तर पंजाब किंग्ज विरुद्ध त्यानं 4 षटकांत 21 धावा देत 3 विकेट घेतल्या, ज्यामुळे सामना मुंबईच्या दिशेनं झुकला.
आयपीएल 2024 मध्ये जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 12.85 च्या सरासरीनं 13 विकेट घेतल्या आहेत. तो सध्या ‘पर्पल कॅप’ च्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. आगामी टी20 विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहचा हा फॉर्म भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तो विश्वचषकात टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज असणार आहे. 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सनं केली चीटिंग? डगआऊटमधून दिला रिव्ह्यू घेण्याचा इशारा; नक्की काय घडलं?
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम भारतासाठी धोकादायक! जहीर खाननं उपस्थित केले अनेक प्रश्न, म्हणाला…
अभिमानास्पद ! भारतीय सशस्त्र दलांच्या महिला अधिकाऱ्यांकडून ‘मिशन साहस-एकता’ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण