भारताचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह याला ‘यॉर्कर स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या यॉर्करपुढे मोठमोठे फलंदाजही गुडघे टेकताना दिसतात. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही बुमराहने आपल्या यॉर्करचा शानदार नमूना दाखवला आणि दिल्लीच्या धाकड फलंदाज रोवमन पॉवेल याची विकेट काढली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली ५० धावांवर सरफराज खानच्या रूपात चौथी विकेट गमावली. त्यानंतर रोवमन पॉवेल (Rovman Powell) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने चिवट झुंज देत संघाचा धावफलक हालता ठेवला. यादरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने डावातील १९वे षटक बुमराहला दिले. बुमराहच्या (Jasprit Bumrah)या षटकातील पहिला चेंडू अक्षर पटेलने खेळला आणि त्याने एक धाव घेतली.
त्यानंतर पॉवेल स्ट्राईकवर आला. बुमराहने षटकातील दुसरा चेंडू पिन पॉईन्ट यॉर्कर (Jasprit Bumrah Pin Point Yorker) टाकला. या चेंडूवर पॉवेलने मोठा फटका खेळण्याते धाडस केले. त्याने चेंडूला हिट करण्यासाठी बॅट फिरवली आणि चेंडू थेट यष्टीला जाऊन धडकला. बुमराहच्या यॉर्करवर मोठा फटका खेळणे पॉवेलला महागात पडले. तो ३४ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ४३ धाा करून त्रिफळाचीत झाला.
Jasprit Bumrah Cracking Yorker to Powell. #MIvDC#IPL
Watch-https://t.co/KADzdQRATA pic.twitter.com/lyA2saKCNS— Desert Post (@cricket_nights) May 21, 2022
Boom Boom Bumrah's Yorker!
Rovman Powell had not answer to this Yorker!
Glad that I could witness it Live from Wankhede!#TATAIPL#MIvDC pic.twitter.com/1OhwCKw0sE
— Nilesh G (@oye_nilesh) May 21, 2022
दिल्लीविरुद्ध बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली. आपल्या कोट्यातील ४ षटके फेकताना त्याने २५ धावा दिल्या आणि दिल्लीच्या ३ फलंदाजांना बाद केले. पॉवेलव्यतिरिक्त पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांना त्याने बाद केले. बुमराहला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. दिल्लीकडून पॉवेलने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याच्याबरोबर कर्णधार रिषभ पंतने ३९ धावा जोडल्या. तर पृथ्वी शॉनेही २४ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात मुंबईकडून सलामीवीर इशान किशनने ३५ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविस (३७ धावा), टीम डेविड (३४ धावा), तिलक वर्मा (२१ धावा) आणि रमनदीप सिंग (१३ धावा) यांच्या योगदानामुळे मुंबईने १९.१ षटकात ५ विकेट्सने हा सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचा १५ वा हंगाम मुंबईसाठी ठरला खूपच वेगळा, संघाबाबत पहिल्यांदाच घडल्या ‘या’ तीन गोष्टी
रोहित शर्माने प्लेऑफमध्ये पोहचलेल्या बेंगलोरला दिल्या शुभेच्छा, तर विराटचे ‘हे’ ट्वीट व्हायरल
IPL च्या १५ व्या हंगामाला मिळाले अंतिम ४ संघ, पाहा कसे आहे प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक