एॅडलेड येथे खेळल्या जात असणार्या पहिल्या कसोटीतील दुसर्या दिवशी, भारताने आपल्या दुसर्या डावाला सुरुवात केली. या डावात भारतीय संघाने 1 गडी गमावून 9 धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघाने 62 धावांची आघाडी घेतली. भारताच्या दुसर्या डावात पुन्हा एकदा सलामी फलंदाज पृथ्वी शाॅ अपयशी ठरला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत होत तंबूत परतला. पृथ्वी फक्त 4 धावा काढू शकला. तो बाद झाल्यानंतर तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नाईट वॉचमन म्हणून बुमराह फलंदाजीला आला. ज्या वेळेस बुमराह फलंदाजीला आला, तेव्हा भारतीय संघ दबावात होता. परंतु बुमराहने मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचा सामना करताना दुसर्या दिवसाचा खेळ संपवला. त्याचबरोबर भारताचा दुसरा फलंदाज बाद होवू दिला नाही.
Promoted to Number 10 from 11 in the first innings & promoted as night-watchman in second inninngs. There is always improvement in whatever Bumrah does. pic.twitter.com/xQYp2rtJem
— Johns. (@CricCrazyJohns) December 18, 2020
जेव्हा दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सर्व भारतीय खेळाडूंनी तंबूत उभे राहून बुमराहचे स्वागत केले. कर्णधार विराट कोहलीने सगळ्यात पुढे उभे राहून बुमराहला शाबासकी दिली. सोशल मीडियावर आयसीसीने हा फोटो शेअर केला आणि तो खुप व्हायरल झाला आहे. लोकांनी यावर खुप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
What was your reaction when you saw Jasprit Bumrah walking in at No.3? 😄#AUSvIND pic.twitter.com/ngnXdterIK
— ICC (@ICC) December 18, 2020
जसप्रीत बुमराहाने 11 चेंडूचा सामना करताना एक ही धाव काढली नाही. मात्र त्याने अधिकतम वेळ स्ट्राईक स्वतःकडे ठेवून नियमित फलंदाज मयंक अग्रवालचे रक्षण केले. त्यामुळे बुमराहाने भारतीय चाहत्यांची मने जिंकली. चाहत्यांनी बुमराहावर कौतुकांचा वर्षाव केला. तत्पूर्वी बुमराहने गोलंदाजी करताना 2 गडी बाद केले.
त्यापूर्वी अश्विनने आपल्या फिरकीचा उत्तम नमुना सादर करताना ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. तसेच उमेश यादवने सुद्धा 3 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 191 धावावर कोसळला. दिवस रात कसोटी सामन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात आघाडी घेण्यात अपयशी ठरला. या अगोदर खेळण्यात आलेल्या 7 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ आघाडी घेण्यात यशस्वी ठरला होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा टीम पेनने केल्या. त्याने नाबाद 73 धावांची खेळी. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लाबुशेनने 47 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून विराट कोहलीने 74 धावांचे योगदान दिले त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 244 धावा उभारल्या.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– बूम बूम बुमराहच्या गोलंदाजीपुढे थंडावले ऑस्ट्रेलियन फलंदाज, अवघ्या ३५ धावांवर गमावल्या २ विकेट्स
– ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजाचा साधारण झेल बुमराहकडून मिस, व्हिडिओ व्हायरल