कार्डिफ। विश्वचषक 2019 पूर्वी भारत विरुद्ध बांगलादेश संघात मंगळावारी(28 मे) पार पडलेल्या सराव सामन्यात भारताने 95 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या.
360 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या बांगलादेशच्या सौम्य सरकार आणि शाकिब अल हसन या फलंदाजांना बुमराहने 10 षटकात अनुक्रमे लागोपाठच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बाद करत भारताला सुरुवातीच्या दोन विकेट्स मिळवून दिल्या.
याबरोबरच बुमराहने सौम्य सरकार आणि लिटॉन दास यांच्यात पहिल्या विकेटसाठी झालेली 49 धावांची भागीदारीही मोडली. सौम्य सरकार 25 धावा करुन झेलबाद झाला. तर त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला शाकिब पहिलाच चेंडू खेळताना शून्य धावेवर बाद झाला.
शाकिब बुमराहने टाकलेल्या एका सुरेख यॉर्करवर त्रिफळाचीत झाला. शाकिबने बुमराहच्या यॉर्करवर फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतू चेंडू त्याच्या बॅटच्या आतील बाजूची कड घेऊन सरळ स्टंम्पवर गेला. त्यामुळे शाकिबला पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले.
What a delivery this was 👌
Jasprit Bumrah bowling Shakib Al Hasan with the perfect yorker first ball!
WATCH ⬇️ https://t.co/Uq6c7a2odF
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) May 28, 2019
या सामन्यात बांगलादेशकडून मुशफिकुर रहिम(90) आणि लिटॉन दासने(73) अर्धशतकी खेळी केल्या. मात्र त्यांना अन्य फलंदाजांची कामगिरी खास न झाल्याने बांगलादेशचा डाव 49.3 षटकातच 264 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादव, युजवेंद्र चहलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी भारताने केएल राहुल आणि एमएस धोनीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 359 धावा केल्या होत्या. राहुलने 99 चेंडूत 108 धावांची खेळी केली. तर धोनीने 78 चेंडूत 113 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने 47 धावांची छोटेखानी चांगली खेळी केली.
गोलंदाजीत बांगलादेशकडून रुबेल हुसेन आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान, मोहम्मद सैफुद्दीन आणि सब्बीर रेहमानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकापूर्वी रिषभ पंतने टीम इंडियाला दिला खास संदेश
–विश्वचषक २०१९: पहिला सामना खेळण्याआधीच दक्षिण आफ्रिकेला बसला मोठा धक्का
–काय सांगता! चक्क धोनीनेच लावली बांगलादेशची फिल्डींग, पहा व्हिडिओ