नुकताच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने २-१ ने विजय मिळवला. ही मालिका भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहली याच्या (Virat Kohli captaincy) कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरली आहे. ही मालिका झाल्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता याबाबत जसप्रीत बुमराह याने (Jasprit bumrah) मोठा खुलासा केला आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि वनडे संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने म्हटले की, “एक संघ म्हणून आम्ही खूप जवळचे आहोत. एका मीटिंगमध्ये त्याने आम्हाला सांगितले होते की, तो कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. एक संघ म्हणून त्याने आम्हाला ही माहिती दिली होती. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याच्या नेतृत्वाला खूप महत्त्व देतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही एक संघ म्हणून त्याला, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने जे योगदान दिले आहे त्यासाठी शुभेच्छा दिल्या. हीच चर्चा त्याच्यासोबत देखील झाली. विराट कोहली नेहमीच आमच्या संघाचा लीडर असेल. १९ जानेवारी पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत विराट कोहली कर्णधार म्हणून नव्हे तर एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.
तसेच जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला की, “हे पाहा, मी त्याच्याबद्दल काही निर्णय घेण्यासाठी इथे नाहीये. परंतु, वैयक्तिकरित्या मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. त्याला चांगलंच माहित आहे की, त्याची मानसिक स्थिती कशी आहे. मला त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा आनंद आहे. कारण मी माझी कारकीर्द त्याच्या नेतृत्वाखाली सुरू केली होती.”
“मी आधी म्हटल्याप्रमाणे, तो संघात खूप ऊर्जा आणतो. ते नेहमीच संघाचा लीडर असेल आणि त्याचे योगदान खूप मोठे आहे आणि भविष्यातही खूप मोठे असणार आहे,” असे जसप्रीत बुमराह म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल २०२२: अहमदाबादने निवडली आपली ‘त्रिमूर्ती’; हार्दिक-राशिदसह ‘या’ युवा फलंदाजावर लावला दाव
बुमराहसोबतच्या ‘हायव्होल्टेज’ वादानंतर आली जेन्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…
हे नक्की पाहा: