---Advertisement---

पदार्पणाच्या सामन्यात एमएस धोनीने बुमराहला दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2020 5:54 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने मागील काही वर्षात क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात प्रभावी कामगिरी केली आहे. बुमराहचे आंतरराष्ट्रीय पदार्पण 2016मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली झाले होते. यावेळी कर्णधार धोनीने त्याला खास सल्ला दिला होता, याबद्दल बुमराहने खूलासा केला आहे.

बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 23 जानेवारी 2016 ला वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाच्या आठवणीबद्दल क्रिकबझलाच्या स्पायसी पीच या शोमध्ये बोलताना बुमराह म्हणाला, ‘त्यावेळी माझ्याजवळ कोणीही आले नाही, मला कोणी काही सांगितले नाही. पण एमएस (धोनी) माझ्याजवळ आला आणि म्हणाला तू जसा आहेस तसाच रहा. तूझ्या खेळाची मजा घे.’

बुमराहने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 40 धावा देत 1 विकेट घेतली होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला बाद केले होते.

त्यानंतर बुमराहने आत्तापर्यंत 13 कसोटी सामन्यात 63 विकेट्स, 64 वनडे सामन्यात 104 विकेट्स आणि 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही बुमराहच्या नावावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---